दिनांक 26 May 2020 वेळ 6:12 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » September

Monthly Archives: September 2019

मनोरमध्ये 13.61 कोटींचा शस्त्र व अंमली पदार्थांचा साठा जप्त

3 एके-47 सदृश रायफलींचा समावेश राजतंत्र न्युज नेटवर्क/मनोर, दि. 30 : मनोर हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या चिल्हार फाटा येथे शस्त्रसाठा व अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असुन या टोळीकडून तब्बल 13 कोटी 61 लाख रुपयांचा शस्त्र व अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. मनोर पोलीस स्टेशन व पालघर स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या ही ... Read More »

स्वच्छ भारत दिवस कार्यक्रम; जिल्ह्यातून 180 प्रतिनिधी साबरमतीला रवाना

प्रतिनिधी/जव्हार, दि. 30 : गुजरात राज्यातील साबरमती येथे 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त संपन्न होणार्‍या ’स्वच्छ भारत दिवस’ कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्यातून 180 प्रतिनिधी आज, 30 सप्टेंबर रोजी रवाना झाले. यामध्ये स्वच्छाग्रही, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षक तसेच तालुका व जिल्हास्तरावरील अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाद्वारे ... Read More »

अंगणवाडी कर्मचार्‍यांची पाण्यासाठी वणवण

खणलेली बोरवेल हातपंपाच्या प्रतिक्षेत प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : तालुक्यातील बिलोशी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अंगणवाडी क्र.1 मधील कर्मचार्‍यांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. विशेष म्हणजे 5 महिन्यापुर्वी येथे बोरवेल खणण्यात आली आहे. मात्र हातपंप किंवा मोटार न बसवल्याने ती निरुपयोगी ठरत आहे. सदर अंगणवाडीमध्ये नियमित वापरासह 117 विद्यार्थी व 14 गरोदर मातांसाठी पोषण आहार बनविण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासते. त्यानुसार येथे ... Read More »

महामार्गावर 6 लाखांचा गुटखा पकडला; कासा पोलिसांची कारवाई

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 30 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर वाहनांच्या तपासणी दरम्यान एका आयशर टेम्पोमधुन 6 लाख 33 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी (दि. 28) रात्री 10 वाजेच्या सुमारास कासा पोलिसांनी ही कारवाई केली. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारोटी टोलनाक्यावर जी.जे. 27/एक्स. 9076 या क्रमांकाच्या आयशर टेम्पोला पोलिसांनी ... Read More »

आणखी 17 जुगार्‍यांवर डहाणू पोलिसांची कारवाई

मसोलीत सुरु होता जुगाराचा अड्डा लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 30 : तालुक्यातील विविध भागात सुरु असलेले जुगाराचे अड्डे सध्या डहाणू पोलिसांच्या निशाण्यावर असुन नुकत्याच चार जुगार्‍यांवर केलेल्या कारवाईनंतर शुक्रवारी (दि. 27) पुन्हा डहाणू पोलिसांनी मसोलीत सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करत 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या जुगार्‍यांकडून लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ... Read More »

कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे

एक परिचारिका व एका शिपायावर केंद्राची जबाबदारी गरिब आदिवासी रूग्णांची होते गैरसोय प्रतिनिधी/वाडा, दि.29 : तालुक्यातील कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. अमोल कोंगे व डॉ. समाधान पगारे या दोन डॉक्टरांची कायम स्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र रूग्ण तपासण्याच्या वेळे व्यतिरीक्त ते रूग्णालयात थांबत नसल्याने, शिवाय दोघेही निवासी राहत नसल्याने या रूग्णालयाचा कारभार एक परिचारिका व एका शिपायाला सांभाळावा लागत ... Read More »

बोईसर : महिलेच्या गळ्यातील 2 लाखांचे मंगळसुत्र खेचले

वार्ताहर/बोईसर, दि. 29 : बोईसर शहरातील मुख्य रस्त्यांवरील बंद असलेल्या पथदिव्यांमुळे रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरुन भरधाव वेगात येणार्‍या चोरट्यांकडून दागिने, मोबाईल लंपास करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना पुन्हा उघडकीस आली असुन एका महिलेच्या गळ्यातील 2 लाख रुपये किंमतीचे मंगळसुत्र भरधाव दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी खेचून लंपास केले आहे. शुक्रवारी (दि. 27) रात्री 8 वाजेच्या सुमारास केशवनगर ... Read More »

उधवा तलासरी मार्गावरील पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी

प्रतिनिधी/तलासरी, दि. 29 : दिवसरात्र लहानमोठ्या वाहनांची वर्दळ असणार्‍या तलासरी-उधवा या मुख्य मार्गावरील उधवा गाव हद्दीतील गेल्या मे महिन्यापासून बंद असलेले पथदिवे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे. तलासरी-उधवा मार्गाचे क्राँक्रीटीकरण झाल्यानंतर ग्रामपंचायतीतर्फे या मार्गावर नविन पथदिवे लावण्यात आले होते. मात्र थोड्याच कालावधीत बहूतांश पथदिवे खराब झाले असुन या मार्गावरुन प्रवास करणार्‍या प्रवासी व नागरीकांना संपूर्ण पावसाळ्यात ... Read More »

भावाचा खून करुन मृतदेहाची सेफ्टीक टँकमध्ये विल्हेवाट; तीन वर्षापूर्वीच्या खुनाची उकल

दहशतवादी विरोधी पथकाचे यश मृत मुलगा दहशतवाद्यांच्या संपर्कात आल्याचा होता संशय प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : तालुक्यातील कुडूसजवळ असलेल्या उसर गावातील एका फार्म हाऊसमध्ये काम करणारा आसामचा 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा 2016 साली अचानक बेपत्ता झाला होता. दरम्यानच्या काळात तो देशविरोधात कारवाया करणार्‍या लोकांच्या संपर्कात असल्याचा पोलिसांचा संशय होता. मात्र तब्बल तीन वर्षांनंतर सदर मुलाचा खून झाला असल्याचे समोर आले असुन ... Read More »

पोषण माह सप्ताह निमित्ताने आयोजित रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/जव्हार, दि. 27 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (उमेद) तालुका व्यवस्थापन कक्ष, जव्हार पंचायत समिती आणि फूड अँड ड्रग्स कंज्युमर वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह सप्ताह निमित्त आज रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जव्हार महाविद्यालयाच्या ग. भा. सरदार हॉलमध्ये पार पडलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अतुल पारसकर व फूड अँड ड्रग्स कंज्युमर ... Read More »

Scroll To Top