दिनांक 21 February 2020 वेळ 11:56 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » August » 07

Daily Archives: 07/08/2019

वाडा : पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून धनादेशांचे वाटप

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : तालुक्यात अतिवृष्टीमुळे वैतरणा नदीला आलेल्या महापुरात नाणे-सांगे ग्रामपंचायत हद्दीतील वरठा पाडा येथील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे पुराच्या पाण्यात जमिनदोस्त झाली आहेत. तर अन्न-धान्य व वस्त्रांसह सर्वच जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने गावकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली असुन त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहेे. या आपत्तीनंतर सरकारी मदतीची वाट पाहण्याशिवाय काही मार्ग नसल्याने अखेर ... Read More »

कर्जमाफीसंबंधी तक्रारीच्या निवारणासाठी तालुकास्तरीय समिती

राजतंत्र न्युज नेटवर्क/ पालघर, दि. 7 : शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अर्थात शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात प्राप्त तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची दर आठवड्याला सोमवार व गुरुवारी बैठक होणार असून या बैठकीत शेतकर्‍यांच्या प्राप्त तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. राज्यामध्ये सन 2009-10 पासून असलेल्या सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा ... Read More »

जागतिक आदिवासी दिनानिमित्त वाड्यात जनजागृती महामेळावा व भव्य रॅलीचे आयोजन

प्रतिनिधी/वाडा, दि. 7 : आदिवासी युवा संघटना व तालुका आदिवासी शिक्षक संघटना यांच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आदिवासी समाज जनजागृती महामेळावा व भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये आदिवासी समाजाची कला संस्कृती, नृत्य, बोहाडा आदी शोभायात्रेद्वारे सादर करण्यात येणार आहेत. जगात सर्वत्र 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या दिवसाचे ... Read More »

पालघर : 63 जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजीची सुरुवात

शाळेचा पट वाढवण्यासाठी पालघर गटशिक्षण अधिकार्‍यांचा उपक्रम राजतंत्र न्युज नेटवर्क/ पालघर, दि. 4 : लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तसेच पालघर जिल्ह्याला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 63 शाळांमध्ये पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्गाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा आगवण केंद्र उमरोळी या शाळेत या उपक्रमाचे उद्घाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे यांच्या हस्ते ... Read More »

ग्रामसेवकांच्या असहकार आंदोलनाला मोखाडा तालुका ग्रामसेवकांचा पाठिंबा!

उद्यापासूनच आंदोलनात सहभागी होणार दीपक गायकवाड/मोखाडा, दि. ७ : राज्यातील ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या व प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत, याबाबत वारंवार बैठका घेऊन व पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने येत्या 9 ऑगस्ट रोजी असहकार आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा देण्यासाठी मोखाडा तालुका ग्रामसेवक संघटना एक दिवसापुर्वीच म्हणजेच उद्या, 8 ऑगस्टपासुनच ... Read More »

Scroll To Top