दिनांक 25 May 2020 वेळ 1:03 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 11

Daily Archives: 11/07/2019

तलासरीतील वडवली येथे भूकंपाच्या धक्क्याने घराचे नुकसान

प्रतिनिधी /तलासरी, दि. 11 : डहाणू व तलासरी तालुक्यातील काही भागांमध्ये मागील वर्षभरापासुन वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. आज तलासरी तालुक्यातील वडवली डोंगरीपाडा येथे दुपारी 2 वाजून 4 मिनिटांनी भूकंपाचा मोठा धक्का बसला. या धक्क्यामुळे येथील जयराम लहानू घुटे यांच्या घराचे मधले मुख्य बहाल तुटून नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र अशा वारंवार बसणार्‍या भूकंपाच्या ... Read More »

वाड्यातील मुख्य रस्त्याची चाळण

शुक्रवारपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु होणार? प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : वाडा ते परळी मार्गे देवगाव या रस्त्याचे नूतनीकरण झाले असून यात वाडा शहरातील मुख्य रस्त्याचाही समावेश आहे. मात्र या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम रखडल्याने ते पावसाळा आला तरी होऊ शकले नाही. परिणामी पावसाच्या आगमनाने शहरातील या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन वाहनचालक, पादचार्‍यांसह विद्यार्थ्यांना या मार्गावरून वाट काढणे जिकरीचे झाले ... Read More »

वाड्यात सर्पदंशाने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. ११ : तालुक्यातील दहिवली या गावातील विनेेश लक्ष्मण बात्रा या सहा वर्षीय मुलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनेश हा बुधवारी रात्री आपल्या घरात कुटुंबियांसोबत झोपला असता पहाटे तीन साडे तीनच्या सुमारास मण्यार जातीच्या सर्पाने विनेशच्या हात व कानाला दंश केला. सर्पदंश झाल्याचे विनेशच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी लागलीच विनेशला वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल ... Read More »

वाड्यातील गारगाई धरणाला मुंबई महापालिकेचा अग्रक्रम

पुनर्वसनाकरिता मोठ्या पॅकेजची तरतूद विस्थापितांचे वाडा तालुक्यातच पुनर्वसन प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : मुंबई शहराची वाढती तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या वाडा तालुक्यातील गारगाई व पिंजाळ धरणांपैकी मुंबई महापालिकेने गारगाई धरणाला अग्रक्रम दिला असून या प्रकल्पामधील विस्थापितांकरिता नोकरीसह लाखो रुपयांचे पॅकेज महापालिका देणार असल्याचे नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व धरणामुळे विस्थापित होणार्‍या ग्रामस्थांच्या उपस्थितीत सांगण्यात आले. राज्यात ... Read More »

मोखाड्यात धुवाधार पाऊस, मोखाडा-त्र्यंबकेश्वर रास्ता गेला वाहून

दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 11 : येथे मागील काही दिवसांपासुन संततधार कोसळणार्‍या पावसाने काल, बुधवार रात्रीपासुन उग्ररुप धारण केले असून दाणादाण उडवून दिली आहे. मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावरील मोरचुंडी येथील नदीला पुर आल्याने पुराच्या पाण्यात मोरचुंडी पुलाच्या बाजुचा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असुन मोखाड्याचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. तर दुसरीकडे तोंरगण घाटात झाडे तुटून व खोडाळा-मोखाडा ... Read More »

Scroll To Top