दिनांक 25 May 2020 वेळ 1:33 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 09

Daily Archives: 09/07/2019

टोलरोड गेला खड्ड्यात!

भिवंडी-वाडा रस्त्याची दुरावस्था बांधकाम विभाग आणि सुप्रीम कंपनीचे दुर्लक्ष प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : वाडा- भिवंडी महामार्गावर पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे असुन महामार्ग धोकादायक बनला आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाही ठेकेदार कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वाडा-भिवंडी हा महामार्ग केवळ नावापुरता शिल्लक असून महामार्गासारखा एकही गुण ... Read More »

जव्हार : गरिबीमुळे आत्महत्या; पोरक्या झालेल्या मुलींच्या शिक्षणाची शासकीय आश्रमशाळेत सोय करणार! -विवेक पंडित

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 8 : जव्हार तालुक्यातील खरोंडा येथे शुक्रवारी रूक्शाना जीवल हांडवा या महिलेने दोन मुलींसह स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमागच्या कारणांचा पोलीस तपास करीत आहेत. या कुटुंबातील तीनही मुलींच्या शिक्षणाची सोय शासकीय आश्रमशाळेमध्ये करण्यात येईल, असे आदिवासी क्षेत्र विकास योजना आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील ... Read More »

डहाणू पोलीसांच्या हस्तक्षेपानंतर एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स विरोधातील आंदोलन स्थगित

राजतंत्र न्युज नेटवर्क/दि. 9 : डहाणू तालुक्यातील आशागड स्थित एसीजी असोसिएटेड कॅप्सुल कंपनीच्या प्रकल्प विस्तारास पेसा अंतर्गत ग्रामसभेने परवानगी नाकारल्यानंतरही बांधकाम चालू ठेवणे अंगलट येत असल्याचे लक्षण आहे. या बेकायदेशीर प्रकल्प विस्ताराकडे शासकीय यंत्रणा डोळेझाक करीत असल्याच्या भावनेतून ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. या इशारर्‍यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या ... Read More »

नूतन बाल शिक्षण संघातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर परिसंवादाचे आयोजन

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 9 : शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न व आव्हानांबाबत चर्चा घडवून आणणे, वैचारिक देवाणघेवाण करणे, परस्परांच्या अनुभवाचा फायदा करुन घेणे यासाठी शैक्षणिक संस्था व शिक्षणक्षेत्रातील व्यक्तींचे एक व्यासपीठ असावे ही संकल्पना साकारण्याच्या उद्देशाने तालुक्यातील कोसबाड येथील नूतन बाल शिक्षण संघातर्फे येत्या शनिवारी (13 जुलै) प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019: अपेक्षा आणि आव्हाने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात ... Read More »

Scroll To Top