दिनांक 21 October 2019 वेळ 2:38 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 08

Daily Archives: 08/07/2019

वाडा : बांधकाम ढासळल्याने चालू ट्रान्सफार्मर कोसळले!

सुदैवाने अप्रिय घटना टळली प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : खंडेश्वरी नाका येथील मंगलमूर्ती अपार्टमेंट समोर विद्युत प्रवाह चालू असलेला ट्रान्सफार्मर दुपारच्या सुमारास अचानक कोसळला. यावेळी सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी या प्रकाराने वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंगलमूर्ती अपार्टमेंटसमोर काही वर्षांपुर्वी विद्युत ट्रान्सफार्मर ठेवण्यासाठी बांधकाम करण्यात आले असुन त्यावर सदर ट्रान्सफार्मर ठेवण्यात आला होता. मात्र हे ... Read More »

तारापूर एमआयडीसीतील नॅपरॉड कंपनीला आग

वार्ताहर/बोईसर, दि. 8 : तारापुर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एका औषध निर्मिती करणार्‍या कंपनीला आज, सोमवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने कामगार वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर आजुबाजुच्या सर्व कारखान्यातील कामगार रस्त्यावर जमा झाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण आणल्यामुळे यात कोणत्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही. तारापूर एमआयडीसीतील प्लॉट ... Read More »

अनुसूचित जमातीच्या युवकांना सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर दि. 7 : सन 2019-20 या वर्षातील सत्र क्र.89 साठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना (युवक) जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण सत्र 1 ऑगस्ट 2019 ते 30 नोव्हेंबर 2019 या कालावधीत मोखाड्यातील पळसुंडे येथील सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावत प्रशिक्षणार्थ्यांना ... Read More »

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

प्रशासन सज्ज; नागरीकांनीही दक्षता घेण्याचे आवाहन राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 8 : मुंबई कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात आज, सोमवार आणि उद्या मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एकूणच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरीकांनी देखील दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत संबंधित क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ... Read More »

वाड्यात वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सुरुवात

दोन लाख वृक्ष लागवडीचे वन विभागाचे उद्दिष्ट वृक्ष संवर्धनासाठी सरसावले नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : राज्य सरकारच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत वाडा तालुक्यातील वन विभाग कार्यालयाने सुमारे दोन लाख वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली असून आज तहसीलदार दिनेश कुर्‍हाडे आणि सहाय्यक वनसंरक्षक अनिल तोरडमल यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वाडा तालुक्यात मोठ्याप्रमाणात ... Read More »

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे केळवे येथे 2500 सुरुच्या झाडांची लागवड

वार्ताहर/बोईसर, दि. 8 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमदार अमित घोडा व पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांच्या हस्ते केळवे समुद्र किनारी श्री सदस्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सुरुच्या झाडांची लागवड केली. दोन वर्षापुर्वी आलेल्या चक्री वादळाचा केळवे समुद्र किनार्‍याला मोठा तडाखा बसला होता. यावेळी येथील शेकडो सुरुची झाडे उन्मळुन पडल्याने समुद्र किनारा ओसाड ... Read More »

महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात युवासेना छेडणार आंदोलन

देखभाल दुरूस्तीचा अभाव खोडाळा विभाग अंधारात दीपक गायकवाड/ मोखाडा, दि. 8 : यंदा पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने तालुक्यात महावितरणच्या ढिसाळ कारभारावर टिका होत आहे. खोडाळा विभागातही सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने तसेच अनेकवेळा तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या युवासेनेने याविरोधात व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. मोखाडा तालुक्यात चालू वर्षी सर्वत्र ... Read More »

जव्हार : गरिबीने घेतला कुटूंबाचा बळी; पतीनंतर पत्नीने दोन मुलींना विष पाजुन केली आत्महत्या

सुदैवाने 8 महिन्यांची चिमुकली बचावली प्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : शासनाकडून आदिवासींच्या उद्धारासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र या योजना खरच गरीब व गरजू आदिवासींपर्यंत पोहोचतात का? असा प्रश्‍न उपस्थित करणारी घटना जव्हार तालुक्यात घडली असुन गरिबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या कुटूंबप्रमुखानंतर महिनाभरातच त्याच्या पत्नीने आपल्या दोन मुलींना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना येथे घडली आहे. यात सदर महिला व ... Read More »

Scroll To Top