दिनांक 25 May 2020 वेळ 1:11 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 05

Daily Archives: 05/07/2019

आदिवासी महिलांची पायपीट थांबणार, सुथेडपाडा व भेंडीपाडा येथे पाणी प्रकल्प कार्यान्वित

प्रतिनिधी/तलासरी, दि. 5 : दादरा नगर हवेली राज्याच्या सीमेलगत असलेल्या व तलासरी तालुक्यातील कोचाई-बोरमाळ या ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या बोरमाळ येथील सुथेडपाडा आणि भेंडीपाडा या गावातील ग्रामीण व आदिवासी बांधवांसाठी आज पिण्याच्या पाण्याच्या दोन शाश्वत प्रकल्पांचे लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (एलटीपीसीटी) यांच्यातर्फे हस्तांतरण करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकल्पांमुळे येथील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. एलटीपीसीटीची ... Read More »

प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधासाठी लोकसहभाग आवश्यक! -डॉ.किरण महाजन

गुन्ह्यांची माहिती देणार्‍यास एक लाखांपर्यंत बक्षीस जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न! राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 5 : प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान करणे हा गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निवड प्रतिबंध) कायद्यानुसार गुन्हा आहे. या कायद्याचे पालन होण्यासाठी शासनाबरोबरच समाजातील विविध घटकांनी सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून प्रयत्न करण्याची निकड उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांनी व्यक्त केली. तर असे निदान रोखणे ही सामुदायिक ... Read More »

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, 12 दुचाक्या हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 5 : नालासोपारा, विरार व अर्नाळा भागात दुचाकींची चोरी करुन धुमाकूळ घालणार्‍या दोन जणांसह त्यांनी चोरलेल्या दुचाकी खरेदी करणार्‍या एका इसमाला अटक करण्यात नालासोपारा पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांपैकी एक आरोपी अल्पवयीन असुन सदर चोरट्यांकडून एकुण 12 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. नालासोपारा उप विभागात तसेच नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी ... Read More »

वाडा : दुकानातून 15 लाख चोरणारा नोकर अखेर गजाआड

10.5 लाखांची रक्कम तक्रारदाराला सुपूर्द प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : वाडा बस स्थानकाशेजारी असलेल्या वाडा स्वीट्स या मिठाईच्या दुकानात 11 जून रोजी चोरी झाली होती. दुकानात काम करणार्‍या 25 वर्षीय रमेश वेलजी मिना या नोकरानेच स्वत:कडे असलेल्या दुकानाच्या चावीने दुकान उघडून कॅश काऊंटरमध्ये ठेवलेली 15 लाख रुपयांची रक्कम चोरी करुन पोबारा केला होता. वाडा पोलिसांनी काल, गुरुवारी त्याला राजस्थानमधील उदयपुर जिल्ह्यातील ... Read More »

Scroll To Top