दिनांक 21 October 2019 वेळ 3:48 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 04

Daily Archives: 04/07/2019

निचोळे गावातील पाणी पिण्यास अयोग्य!

कंपनीच्या रसायन मिश्रीत सांडपाण्यामुळे जल प्रदूषण झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावली कारणे दाखवा नोटीस कंपनीने आरोप फेटाळले प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : तालुक्यातील निचोळे गावात असलेल्या ’श्री कृष्णा डेरी फॉर्म’ या कंपनीच्या प्रदुषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे. ... Read More »

पोशरी येथे 10 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 4 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर आणि वाडा तालुक्यातील पोशरी येथील आयडीयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या बुधवारी (दि. 10 जुलै) सकाळी 10 वाजता आयडीयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व कौशल्य विकास प्रशिक्षण, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास परिसरातील 15 नामांकित ... Read More »

सातपाटी गावात उधाणाचे पाणी!

बंधार्‍याच्या दुरावस्थेमुळे गावकर्‍यांचे हाल वार्ताहार/बोईसर, दि. 4 : पालघर तालुक्यातील प्रमुख बंदर असलेल्या सातपाटी गावाला आज दुपारी समुद्राला आलेल्या उधाणामुळे लाटांचा मारा सहन करावा लागला. यावेळी समुद्र किनारी असलेल्या अनेक घरांमध्ये उधाणाचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले. येथील लाटांना रोखणारा धुपप्रतिबंधक बंधारा नादुरुस्त व अनेक ठिकाणी त्याला भगदाड पडले असल्याने पावसाळा संपेपर्यंत येथील ग्रामस्थांना अशा परिस्थितीशी सामना करावा लागणार ... Read More »

पुराच्या पाण्यात बूडून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटूंबियांना राष्ट्रवादी व बविआची मदत

प्रतिनिधी/जव्हार, दि. 4 : तालुक्यातील किरमीरा दाभलोन पैकी गुंधनपाडा येथील एकाच परिवारातील काका आणि पुतण्या साकळतोड नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि. 1) घडली होती. जान्या उंबरसाडा व काकड उंबरसाडा अशी या दुर्घटनेत मृत पावलेल्या दोघांची नावे असुन त्यांच्या मृत्यूनंतर अडचणीत सापडलेल्या त्यांच्या कुटूंबियांना राष्ट्रवादी काँग्रेस व बहूजन विकास आघाडीतर्फे प्रत्येकी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. ... Read More »

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघातात 3 ठार

मृतांमध्ये वडिलांसह 2 लहान मुलांचा समावेश राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 4 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मागून भरधाव वेगात येणार्‍या टेम्पोने नॅनो कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एकाच कुटूंबातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. थॉमस उलेदर, बेली उलेदर (वय 11) व इदरायल उलेदर (वय 7) अशी उपघातात मृत पावलेल्या तिघांची नावे असुन प्रोटेस्टंट ... Read More »

राज्यातील औषध निर्माण अधिकार्‍यांना शासकिय दिरंगाईचा फटका!

कागदी घोड्यांच्या शर्यतीत अडकला सुधारीत वेतनश्रेणीचा प्रस्ताव 3500 कर्मचारी बाधीत दीपक गायकवाड /मोखाडा, दि. 4 : राज्यातील हजारो औषध निर्माण अधिकारी या संवर्गाच्या सरळ सेवा भरती नियमात बदल करून सुधारीत वेतनश्रेणी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब औषध निर्माण अधिकारी कल्याण महासंघ ही संघटना मागील 15 वर्षांपासून झटत आहे. मात्र त्यांच्या या रास्त मागणीचा प्रस्ताव हा आजही कागदी घोड्यांच्या शर्यतीतच ... Read More »

कारमधुन गुटख्याची वाहतूक, 6.43 लाखांचा गुटखा पकडला

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 4 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर पोलिसांनी एका कारमधुन 6 लाख 43 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी कारचा चालक महेंद्र नारायण गर्ग (वय 32, रा. सफाळा) याला अटक करण्यात आली आहे. 2 जुलै रोजी रात्री 9.10 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. महामार्गावरील खानिवडे टोलनाक्यावर पोलिसांनी एम.एच.06/बी.सी. 1000 या क्रमांकाच्या इनोव्हा कारला संशयावरुन ... Read More »

Scroll To Top