दिनांक 25 May 2020 वेळ 12:59 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » July » 03

Daily Archives: 03/07/2019

प्रलंबित 2900 वनहक्क दावे निकाली काढणार!

जिल्हाधिकार्‍यांसह यंत्रणा जोमाने कार्यरत राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 3 : अनुसूचित जमाती व इतर पारंपरीक वन निवासी (वनहक्काची मान्यता) 2006 नियम 2008 सुधारीत नियम 2012 अन्वये पालघर जिल्ह्यात वनमित्र मोहिमेअंतर्गत वनहक्क दाव्यांना मंजुरी देण्याचे काम करण्यात येत आहे. लोकसभेच्या आचारसंहितेमुळे काही काळासाठी थांबलेल्या या कामास पुन्हा सुरूवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह जिल्हा प्रशासकीय यंत्रणा जोमाने कार्यरत झाली ... Read More »

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पतीला अखेर अटक

प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : मागील सहा वर्षांपासून सासू व पतीने शारीरिक व मानसिक छळ केल्याने व्यथित होऊन संगिता जाधव या विवाहितेने 3 जून रोजी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. तर या घटनेनंतर तिचा पती व सासू फरार झाले होते. काल, मंगळवारी तिच्या पतीला अटक करण्यात आली असुन सासू अद्याप फरार आहे. संगिता मुकेश जाधव (वय 30, रा. खनिवली) या ... Read More »

पालघर जिल्ह्यात भूकंप विरोधी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सुरु करणार! -मदत व पुनर्वसन मंत्री

मुंबई, दि. 3 : भूकंप विरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून घराचे बांधकाम करता यावे यासाठी ग्रामीण भागात गवंड्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकर मंजुरी मिळावी यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल. राज्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून पालघर जिल्ह्यात हे प्रशिक्षण सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती ... Read More »

जव्हारमध्ये काका व पुतण्या नदीच्या पुरात गेले वाहून

प्रतिनिधी/जव्हार, दि. 3 : सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील दाभालोन पैकी गुंजुंनपाडा येथील काका-पुतण्या साकळतोडी नदीच्या पुरात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जाना सोनू उंबरसाडा (वय 60) व काकड बाबन उंबरसाडा (वय 40) अशी सदर काका-पुतण्याची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 1) मुसळधार पाऊस सुरु असताना संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास जाना उंबरसाडा हे शेताकडे गेले ... Read More »

कृषी दिनानिमित्त माहीम येथील शेतकर्‍याचा विशेष सत्कार

वार्ताहर/बोईसर, दि. 3 : स्वर्गीय वसंतराव नाईक जयंती निमित्त साजरा करण्यात येणार्‍या कृषी दिन निमित्ताने पालघर जिल्ह्यात कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे माहीम येथील बागायतदार शेतकरी जगन्नाथ पिलाजी राऊत यांचा पालघर जिल्हा परिषदेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. केळी, पालवेल, सुपारी, नारळ या पारंपारिक पिकांसह जगन्नाथ राऊत यांनी सुमारे दोन एकर क्षेत्रावर जायफळ, लवंग, काळीमिरी, दालचिनी, कोकम इत्यादी मसाले पिकांची लागवड ... Read More »

पालघर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 152 दशलक्ष पाणीसाठा!

कवडास बंधारा 100 टक्के भरला जिल्ह्यातील धरणे सुमारे 50 टक्के भरली राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 3 : पालघर जिल्ह्यात मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. यामुळे जिल्ह्यातील सूर्या मोठा प्रकल्प अंतर्गत येणार्‍या धामणी धरणात 106.006 दशलक्ष तर कवडास उनैयी बंधार्‍यात 9.96 दशलक्ष पाणीसाठा निर्माण झाला आहे. धामणी धरण 38.36 टक्के तर कवडास बंधारा 100 टक्के भरला असल्याची माहिती ... Read More »

Scroll To Top