दिनांक 20 February 2020 वेळ 10:46 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 17

Daily Archives: 17/06/2019

जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी आणले बैलगाडीतून विद्यार्थी

वाडा, दि. १७: शिक्षणाकडे विद्यार्थ्यांना ओढ निर्माण व्हावी म्हणून राज्यभर शाळा प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असतांनाच पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नीलेश गंधे यांनी वाडा तालुक्यातील विलकोस येथील प्राथमिक शाळेत नव्याने दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून सारथ्य करत मिरवणुकीने शाळेत आणले. तर किरवली येथील कर्णबधिर शाळेतील विद्यार्थ्यांचेही शब्दाविन संवादू अशी आत्मिक भावना जोडून अनोखे स्वागत ... Read More »

आंबे तोडल्याच्या रागातून सख्ख्या भावाचा खून

वाडा, दि. १७: झाडावरील आंबे तोडल्याचा राग मनात बाळगून जयवंत पाटील या इसमाने सख्ख्या भावाचा खून केल्याच्या आरोपाखाली वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा तालुक्यातील पालसाई येथे रहाणाऱ्या जयवंत पाटील याचा भाऊ दिलीप पाटील याने (बुधवार, दि. १२ रोजी) घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे पाडल्याचा राग मनात धरून जयवंतने त्याला जाब विचारला व दांडूक्याने मारहाण केली. ... Read More »

जिल्हा परिषद शाळांचे प्रवेशोत्सव साजरे 

पालघर, दि. १७: प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी याकरिता त्यांचे पहिल्या दिवशी जंगी स्वागत करण्यात येते. पालघर तालुक्यातील हनुमान नगरच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फुगे लावून सजवून आणलेल्या कारमधून वाजत गाजत शाळेत आणून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला . अशा प्रयत्नांतून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 90 टक्के दिसून आली. विद्यार्थ्यांची वाजतगाजत प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांना ... Read More »

बोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार

बोईसर, दि. १७: पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराने पोलीस निरीक्षकाला प्रलोभन दाखवल्याच्या कथित आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि विशेष पथकातील या संघर्षामुळे पालघर पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. जनार्दन परबकर हे बोईसर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्य़रत आहेत. तर रमेश नौकुडकर हे स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार म्हणून ... Read More »

Scroll To Top