दिनांक 26 May 2020 वेळ 5:11 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 13

Daily Archives: 13/06/2019

सफाळे-केळवे गावांना जोडणारा माकुणसार पूल धोकादायक स्थितीत

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : सफाळ्याला केळवे, पालघर व माहिमशी जोडणार्‍या राज्य महामार्गावरील माकुणसार खाडीवरील पूल अतिशय धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. आज डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेसह केळवे ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी या पुलाची पाहणी केली असता पुलाचे ऑडिट व्हावे व लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. माकुणसार खाडीवरील पूल बांधून अनेक वर्षे झाली आहेत. केळवे हे पर्यटन ... Read More »

वाड्याच्या सभापती अश्विनी शेळके अपघातातून थोडक्यात बचावल्या!

पालघर-मनोर रस्त्यावरील वाघोबा खिंडीत शासकीय वाहनाला ट्रकची धडक प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके या बुधवारी (दि.12) पालघर येथील सर्वसाधारण सभा आटोपून सायंकाळच्या सुमारास वाड्याच्या दिशेने येत असताना वाघोबा खिंडीत एका ट्रकने त्यांच्या जीपला जोराची धडक दिली. या अपघातात त्या थोडक्यात बचावल्या आहेत. पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. 12) पालघर येथे असल्याने वाडा पंचायत ... Read More »

वाड्यात गरव्या भात पिकाच्या बियाणांची वानवा

हळव्या भात बियाणांचे काही प्रमाणात वाटप गरव्या बियाणांची मागणीच नाही कृषी विभाग अजूनही निद्रिस्त प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वाडा तालुका शेतीप्रधान तालुका असून येथे भातशेतीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यात हळव्या भातशेतीचे प्रमाण 25 टक्के तर निमगरवे व गरव्या भातशेतीचे प्रमाण 75 टक्के असताना पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून केवळ हळवे भात बियाणे काही प्रमाणात मागविण्यात आले आहे. तर गरव्या ... Read More »

पेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार! -खा. राजेंद्र गावित

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : ईपीएस-95 पेन्शनधारकांच्या समस्यांची मला जाणिव असून पेन्शनवाढीसाठी कोशियारी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या प्रमुख मागण्यांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन, येत्या हिवाळी अधिवेशनात याप्रश्‍नी संसदेत आवाज उठवून पेन्शनधारकांना न्याय मिळवून देणार, असे आश्वासन पालघर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी पेन्शनधारकांच्या पालघर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात दिले. पेन्शनधारकांच्या पालघर जिल्हा ... Read More »

वाडा तालुक्याला वायु वादळाचा फटका

अनेक घरांचे, पोल्ट्री फार्मचे छप्पर उडाले! प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : वायु वादळाने कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असताना त्याचा फटका तालुक्यातील टकली, खरीवाली, जामघर, अबिटघर आदी गावांनासुद्धा बसला असून अनेक घरांची कौले, पत्रे तसेच शेतकर्‍यांच्या पोल्ट्री फॉर्मचे पत्रे उडून व विजेचे पोल आणि झाडे उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वायु वादळाने कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात झोडपुन काढले. या वादळाचा ... Read More »

कुडूसमध्ये आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून 10 लाख लांबवले!

प्रतिनिधी/वाडा, दि. 13 : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन रोजच कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडू लागल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे. दोन दिवसांपुर्वींच मिठाईच्या दुकानातील 15 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच काल, बुधवारी रात्री कुडूस येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडून सुमारे दहा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या ... Read More »

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू!

प्रतिनिधी/वाडा, दि.13 : दुचाकीवरून भरधाव वेगात भोपीवलीहून गालतरेला जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सागर किसन डुकले (वय 21) असे सदर तरुणाचे नाव असुन या अपघाताची वाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. मांडा-भोपिवली येथे राहणारा सागर हा गालतरे येथे कामाला होता. रात्रपाळी असल्याने तो काल, बुधवारी रात्री ... Read More »

Scroll To Top