दिनांक 25 May 2020 वेळ 2:27 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 12

Daily Archives: 12/06/2019

बोर्डीरोड रेल्वे स्थानकात अनर्थ टळला; वादळी वाऱ्याने निर्माणाधीन पूलाचे गर्डर आडवे झाले

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. १२ : डहाणू तालुक्यातील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक असलेल्या बोर्डीरोड रेल्वे स्थानकानजिक बांधल्या जाणाऱ्या रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रिजला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. वाऱ्याने या निर्माणाधीन पुलावर ठेवलेले गर्डर (लोखंडी खांब) एकमेकांवर आडवे पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे येथे काम करीत असलेल्या काही कामगारांनी खाली उड्या मारल्या. या धांदलीमध्ये ४ कामगार जखमी झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक ... Read More »

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा 17 जुलैपासून

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 12 : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत या परिक्षा घेण्यात येतील. दहावीची पुरवणी लेखी परिक्षा 17 जुलैपासून 30 जुलैपर्यंत घेण्यात येईल. तर ... Read More »

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 12 : प्रशासनामध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम – 2019 मध्ये सहभागाची अंतिम मुदत 14 जून 2019 पर्यंत असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमातून निवड झालेल्या युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची ... Read More »

मिठाईच्या दुकानात १५ लाखांची चोरी

दुकानात काम करणार्‍या तरुणावर संशय प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : वाडा बसस्थानकानजीक असलेल्या वाडा स्वीट्स मार्ट या दुकानात रात्रीच्या सुमारास चोरी झाली असून दुकानातील पंधरा लाख रुपये रोख चोरीला गेले असल्याची माहिती दुकान मालक मोहनराम चौधरी यांनी सांगितले. वाडा स्वीट्स मार्ट या दुकानात मालकासह इतर तिघे नौकर काम करत असून यापैकी एकजण सकाळ पासून दुकानात आला नसल्याने व दुकानाचे शटर किंवा ... Read More »

वायू चक्रीवादळ: कोकण समुद्र किनारे बंद ठेवण्याच्या सूचना

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 12 : अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून 12 व 13 जून रोजी या भागातील समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती-ओहोटी होणार असल्यामुळे कोकण किनारा जिल्ह्यातील समुद्र किनारे पर्यटक व स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्य आपत्ती निवारण कक्षाने दिली आहे. वायू चक्रीवादळामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, ... Read More »

टंचाईग्रस्त खोडाळ्याला शिवसेनेकडून मोफत पाणी वाटप

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 12 : 1980 च्या दशकानंतर प्रथमच भीषण पाणी टंचाईशी सामना करणार्‍या खोडाळा शहराला शिनसेनेने मदतीचा हात दिला आहे. आजमितीस खोडाळा शहरात शिवसेनेच्या खोडाळा शाखेमार्फत दररोज पाच टँकर पाणी पुरवठा केला जात असल्याने रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. खोडाळा शहराला पाणी पुरवठा करणार्‍या एकमेव तलावातील पाणी तलावाच्या नुतनीकरणासाठी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे ऐन अखेरच्या काळात सन 1980 च्या ... Read More »

अपंगत्वावर मात करत पटकावले 89 टक्के गुण!

बोईसरचा आदित्य ठरला शाळेत अव्वल वार्ताहर/बोईसर, दि. 12 : गेल्या तीन-चार वर्षांपासून कमरेखालील स्नायूवर शरीराचे नियंत्रण नसलेल्या बोईसर येथील आदित्य विकास संदानशिव या विद्यार्थ्याने बोईसर एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. स. दा. वर्तक शाळेत शाळांत परीक्षेत (एसएससी) अव्वल क्रमांक पटकावला आहे. आपल्या अपंगत्वावर मात करून जिद्दीच्या बळावर पुढे उच्चशिक्षित होऊन शासकीय सेवेत नोकरी करण्याच्या निर्धार या विद्यार्थ्याने व्यक्त केला आहे. मूळच्या जळगाव ... Read More »

96.80% गुणांसह दिशांक केशव नायक ठरला डहाणू तालुक्यातील टॉपर

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. १२ : येथील एचएमपी हायस्कूलचा विद्यार्थी दिशांक केशव नायक याने एसएससी परीक्षेत 96.80 टक्के गुण मिळवून डहाणू तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिशांक हा हॉटेल व्यावसायिक केशव नायक (हॉटेल मंजूनाथ) यांचा मुलगा आहे. दिशांकच्या या यशाने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दिशांकने स्वतःबरोबरच शाळेचाही नावलौकिक वाढवला असल्याची प्रतिक्रिया एचएमपी स्कूलचे ... Read More »

Scroll To Top