दिनांक 30 May 2020 वेळ 8:05 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 11

Daily Archives: 11/06/2019

अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ

मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 11 : भारताच्या पूर्वमध्य व दक्षिण पूर्व अरबी समुद्रात वायू चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे उद्या दि. 12 व दि. 13 जून रोजी महाराष्ट्राच्या समुद्र किनार्‍यावर वार्‍याचा वेग वाढणार आहे. तर कोकण व गोव्यातील काही भागात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले ... Read More »

अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करू नये; डहाणू नगरपरिषदेचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर. दि 11 : डहाणू नगरपरिषद हद्दीतील लोणीपाडा-काटीरोड येथील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे डहाणू नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने डहाणू पोलीस स्टेशनच्या मदतीने दिनांक काल, जून रोजी कारवाई करून जमीनदोस्त केली. ही बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याबाबत अनेक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून वेळोवेळी तक्रारी व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार संबंधित अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम करणार्‍यांविरुद्ध नोटीसा बजावण्यात आल्या होत्या, ... Read More »

विक्रमगड पोलिसांची कर्तव्यदक्षता, बेपत्ता मुलीचा 5 तासात शोध

राजतंत्र न्युज नेटवर्क/विक्रमगड, दि. 11 : बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या व बेपत्ता झालेल्या 11 वर्षीय मुलीचा अवघ्या पाच तासांच्या आत शोध घेण्यात विक्रमगड पोलिसांना यश आले असुन पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे कौतूक होत आहे. विक्रमगड तालुक्यातील शेवते ठाकुरपाडा येथील महेश पोट्या गोवींद यांची 11 वर्षीय मुलगी करीना 5 जून रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. ... Read More »

वाडा तालुका पत्रकार संघाला राज्यस्तरीय आदर्श पत्रकार संघ पुरस्कार

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : मराठी पत्रकार परिषद (मुंबई) या पत्रकारांच्या अखिल भारतीय स्तरावर काम करणार्‍या पत्रकार संघटनेतर्फे वाडा तालुका पत्रकार संघाला प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. रविवारी (दि. 9) बीड जिल्ह्यातील वडवणी येथे पार पडलेल्या तालुका अध्यक्षांच्या भव्य अशा मेळाव्यात पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा व दैनिक ... Read More »

तलासरी : विविध अपघातात 2 ठार

राजतंत्र न्युज नेटवर्क/तलासरी, दि. 11 : येथे काल, सोमवारी घडलेल्या 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका ट्रकचालकाचा तर एका पादचार्‍याचा समावेश आहे. काल, संध्याकाळी 4.30 च्या सुमारास डी.डी.03/के. 9342 या क्रमाकांच्या ट्रकने एम.एच.12/आर.एन.0468 या क्रमांकाच्या 35 वर्षीय ट्रकचालकाला धडक दिल्याने सदर ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या घटनेत रात्री 8 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेने पायी प्रवास ... Read More »

उप जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरला मारहाण

घटनेच्या निषेधार्थ बाह्यरुग्ण विभाग बंद राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 11 : उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी डहाणू उप जिल्हा रुग्णालयाचे डॉ. डिसोझा (सर्जन) यांना मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मृताचा मुलगा व अन्य एका अल्पवयीन नातेवाईकाचा समावेश आहे. डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांमध्ये तीव्र संताप ... Read More »

विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू!

प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : घरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने स्विच बोर्ड तपासत असताना विजेचा जोरदार झटका लागून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कंचाडपासून काही अंतरावर असलेल्या शेलरपाडा येथे घडली आहे. शेलारपाडा येथील एकनाथ झिपर शेलार हा तरुण आज, मंगळवारी सकाळी झोपेतुन उठला असता घरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे त्याचे लक्षात आले. यावेळी त्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घरातील ... Read More »

Scroll To Top