दिनांक 30 May 2020 वेळ 9:15 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 10

Daily Archives: 10/06/2019

विरार : जुगार अड्ड्यावर छापा, 12 जुगारी अटकेत

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 10 : येथील कारगिलनगर भागात असलेल्या राजश्री भिम ऑनलाईन या जुगाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने छापा मारत 12 जुगार्‍यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडील साडेसात हजारांची रक्कम जप्त केली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी, 8 जुन रोजी पोलिसांनी ही कारवाई केली असुन राजेश कन्हैया गुप्ता (वय 46), सर्फराज नजिर अहमद शेख (वय 30), ... Read More »

सफाई कर्मचार्‍यांबाबत समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे! -दिलीप हाथीबेड

प्रतिनिधी/पालघर, दि. 10 : सफाई कर्मचारी करीत असलेल्या कामांमुळे परिसर स्वच्छ राहून नागरीक अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. त्यांचे काम सैनिकांच्याच तुलनेचे आहे. त्यामुळे सफाई कर्मचार्‍यांकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी व्यक्त केले. हाथीबेड सोमवारी पालघर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. नालासोपारा येथे मागील महिन्यात ड्रेनेज लाईन साफ करताना तीन ... Read More »

वन कायद्याविरोधात श्रमजीवींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्चा!

रानभाज्या व रानमेव्याच्या पालखी व टोपल्या घेऊन मोर्चात सहभागी झाले कार्यकर्ते! वार्ताहर/बोईसर, दि. 10 : केंद्र सरकारच्या प्रस्तावित भारतीय वन कायदा सुधारणा-2019 या विधेयकाच्या मसुद्यातील तरतुदी आदिवासी कष्टकरी वन हक्क दावेदारांना उद्ध्वस्त करणार्‍या आहेत, असे सांगत आज श्रमजीवी संघटनेने हजारोंच्या संख्येने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जंगल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे या घोषणेने परिसर दणाणून सोडला. या विधेयकाच्या अन्यायकारक ... Read More »

किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाचा खून!

वाडा येथील घटना; आरोपीस तात्काळ अटक प्रतिनिधी/वाडा, दि. 10 : वडिलांच्या घरी पत्नीसह येऊन झोपल्याचा राग मनात धरून सख्ख्या थोरल्या भावाने धाकट्या भावाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारल्याची घटना वाडा तालुक्यात घडली आहे. आरोपी भावाला तत्काळ अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील साईदेवळी-आपटी येथील कातकरी पाडा येथे सांबरे कुटुंबियांचे घर असून शनिवारी रात्री शरद मधुकर सांबरे हा ... Read More »

जव्हार रुग्णालयास 200 खाटांची मंजूरी

54 कोटी रुपयांची तरतूद! प्रतिनिधी/जव्हार, दि. 10 : येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयास 200 खाटांची मंजूरी मिळाली असुन यासाठी 54 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नागरीकांना दिलासा मिळाला असुन येथे उपचार घेणार्‍या रुग्णांची होणारी हेळसांड काहीप्रमाणात कमी होणार आहे. जव्हार तालुक्यात आरोग्य सेवेच्या नावाने बोंब असुन मोठ्या सोयीसुविधा असलेल्या रुग्णालयाची येथे गरज आहे. तालुक्यात पतंगशाह कुटीर रुग्णालय ... Read More »

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ओझर कुंडाचापाड्यात पोचली बससेवा

प्रतिनिधी/जव्हार, दि. 10 : तालुक्यापासून 36 कि.मी. अंतरावर असलेल्या ओझर कुंडाचापाड्यात स्वातंत्र्यनंतर पहिल्यांदा बस पोहचली आहे. बससेवा सुरु झाल्याने येथील ग्रामस्थ आणि खासकरून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असून, त्यांनी एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत. दरम्यान, बसची पहिलीवहिली फेरी घेऊन आलेल्या चालक-वाचकांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून बसला फुलांची माळ, हार घालून सजवण्यात आले व नारळ फोडून पूजा करण्यात आली. नव्याने सुरु करण्यात आलेल्या या ... Read More »

डहाणू : सेवानिवृत्त कर्मचारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!

प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या डहाणू विभागाची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल, रविवारी (9 जून) सकाळी 10 वाजता आगर जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून संघाचे डहाणू विभाग अध्यक्ष मुरलीधर माच्छी, डहाणू तालुका अध्यक्ष मारुती वाघमारे व सरचिटणीस बापुराव देवकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलनाने ... Read More »

Scroll To Top