दिनांक 25 May 2020 वेळ 1:32 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 09

Daily Archives: 09/06/2019

खोडाळ्याला पाणीपुरवठा करणारे तलाव पडले कोरडे!

पाण्याअभावी पाणीपुरवठा बंद! टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी! मागणी करूनही मिळेना टँकर ग्रामस्थ संतप्त! प्रतिनिधी/मोखाडा, दि. 9 : तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणार्‍या तलावातील पाणी साठा संपल्याने येथील नळपाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यातच गावातील विहिरीही कोरड्या पडल्यानेे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे खोडाळा गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामपंचायतीने मोखाडा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ... Read More »

अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेत, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि.9 : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 व 12 जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील. हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या प्रभावामुळे या कालखंडात किनारपट्टीवर वार्‍याचा वेग वाढलेला दिसेल. चक्रीवादळाच्या जवळ असलेला समुद्र अधिक खवळलेला राहील, तर किनारपट्टीजवळ समुद्र ... Read More »

वाड्यात घरफोडीचे सत्र सुरुच; विवेकनगर येथून लाखोंचा ऐवज लंपास

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : वाड्यात मागील काही महिन्यांपासुन चोरट्यांनी धुडघूस घातला असुन आता विवेकनगर येथील सुबोध वेखंडे यांच्या घरात चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली असुन चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा टाळा तोडून घरात प्रवेश करत 4 जोड सोन्याचे कर्णफुले, सोन्याच्या दोन चेन, तीन मोबाईल असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची माहिती ... Read More »

जव्हारचे निसर्गरम्य पर्यटन स्थळ सनसेट पॉईंटची स्वच्छता

प्रतिनिधी/जव्हार, दि. 9 : ग्रामीण मैत्रीण महिला बचतगट महासंघ आणि स्वामींनी युवती बचत गटाकडून शहरातील प्रेक्षणीय व लोकप्रिय निसर्गरम्य पर्यटन स्थळ सनसेट पॉइंटची स्वच्छता करण्यात आली. बचत गटाच्या अध्यक्षा प्रा. प्रज्ञा कुलकर्णी, सचिव कामिनी मेघपुरीया तसेच स्वामींनी युवती बचत गटाच्या देवयानी वाघ यांच्या नेतृत्वात ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. निसर्गाने मुक्त हस्ताने रंगांची उधळण करीत जव्हारच्या सृष्टी वैभवात वाढ केली ... Read More »

18 वर्षीय तरुणीवर बलात्कार, आरोपी तरुणाला अटक

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : 18 वर्षीय तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार करणार्‍या 21 वर्षीय तरुणाला वाडा पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ राजेंद्र सवर असे अटक तरुणाचे नाव असुन आरोपी व पीडित तरुणी अबिटघर या एकाच गावातील रहिवासी आहेत. नवनाथ सवरने एप्रिल ते 22 मे 2019 दरम्यान पीडित तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी देत वेगवेगळ्या ... Read More »

Scroll To Top