दिनांक 30 May 2020 वेळ 9:33 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 06

Daily Archives: 06/06/2019

वाड्यात वनमाफियांची बेसुमार वृक्षतोड व माती उत्खनन!

चौकशीची नागरिकांची मागणी प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : तालुक्यातील खुपरी वनक्षेत्र कार्यक्षेत्रात येणार्‍या खुपरी गावातील गट नंबर 151 मधील क्षेत्रात बेकायदा हजारो ब्रास मातीचे उत्खनन तर याच कार्यक्षेत्रातील जाळे येथील 15 एकर जागेतून बेकायदा वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणाने वनमाफियांचे धाबे दणाणले असुन याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील खुपरी गावाच्या ... Read More »

बियाणे खरेदीसाठी शेतकर्‍यांची झुंबड!

अनेक शेतकरी रिकाम्या हाती माघारी परतले प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दिल्या जाणार्‍या अनुदानित भात पिकांच्या बियाणांचे वाड्यात गुरुवारपासून पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून वितरण करण्यात आले. मात्र वितरणाच्या नियोजनशून्य कारभाराने बियाणांची खरेदी करण्यासाठी पंचायत समितीच्या गोडाऊनबाहेर शेतकर्‍यांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली. तर बियाणांच्या तोकड्या पुरवठ्यामुळे अनेक शेतकर्‍यांना बियाणे न घेताच माघारी परतावे लागले. पावसाळा तोंडावर आल्यावर ... Read More »

डहाणू : एकाच दोरीने गळफास घेऊन तरुण व विवाहितेची आत्महत्या

राजतंत्र न्यूज नेटवर्क/ डहाणू, दि. 6 : आगवण नवासाखरापाडा येथील एका शेतात एक तरुण व विवाहितेचा मृतदेह आढळून आला असुन या दोघांनी शेतातील एका झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. आगवण नवासाखरापाडा येथील नितीन यशवंत बालशी (वय 24) हा तरुण काल, 6 जुन रोजी कुणाला काहीएक न सांगता घरातून बाहेर पडला होता. नितीन उशिरापर्यंत ... Read More »

पोलीस कल्याण सप्ताहांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 6 : पालघर जिल्ह्याच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या कुंटुंबीयांकरीता 1 जून ते 8 जून दरम्यान वार्षीक पोलीस कल्याण सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत विविध स्पर्धा तसेच कार्यक्रम राबविण्यात येत असुन आज, 6 जून रोजी तारापुर पोलीस स्टेशन येथे बोईसर उप विभागातील बोईसर, तारापुर व वाणगांव या पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या ... Read More »

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची चेन हिसकावली

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 5 : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने 62 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 47 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन एका चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून लंपास केल्याची घटना विरार येथे घडली आहे. आतापर्यंत दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन रस्त्यावर चालणार्‍या महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणारे चोरटे आता इमारतीत शिरुन दागिने हिसकावू लागल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल, बुधवारी सकाळी 7 च्या ... Read More »

पालघर उपविभागीय कार्यालय होणार जमीनदोस्त!

इमारत बांधणारा ठेकेदार अजूनही बिलाच्या प्रतीक्षेत काही महिन्यासाठी पालघर नगरपरिषदेच्या कार्यालयातून चालणार कारभार वार्ताहर/बोईसर, दि. 6 : पालघर जिल्ह्याच्या नव्याने उभारण्यात येणार्‍या जिल्हा मुख्यालयाच्या आवारामध्ये पालघरचे उपविभागीय कार्यालय बांधण्यात आले आहे. हे उपविभागीय कार्यालय उभारुन सुमारे साडेचार वर्ष झाले आहेत. मात्र या कार्यालयाच्या इमारतीचा विस्तार व सुशोभीकरणाच्या कामात अडचणी निर्माण होत असल्याने ते जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ... Read More »

Scroll To Top