दिनांक 30 May 2020 वेळ 8:14 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 05

Daily Archives: 05/06/2019

जव्हारमध्ये दोन घरे जळून खाक!

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर कुटुंब उघड्यावर, तहसीलदारांनी भेट देऊन केली पाहणी प्रतिनिधी/जव्हार, दि. 5 : जव्हार तालुक्यातील खांबाळा ग्रामपंचायत हद्दीत मोडणार्‍या पासोडीपाड्यातील दोन आदिवासींची घरे अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहेत. या आगीत घरातील एक बैल, गाय, वासरू व घरातील वर्षभरासाठी साठवलेले धान्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. खंबाळा पैकी पासोडीपाडा येथील ... Read More »

वाडा : वीट भट्टी कामगाराचा खून, अवघ्या दोन तासात आरोपीला अटक

प्रतिनिधी/वाडा, दि. 5 : वीट भट्टीवर काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेऊनही कामावर न गेल्याचा राग मनात धरून डोक्यात कोयत्याने घाव घालून वीट भट्टी कामगाराचा खून करणार्‍या आरोपीला अवघ्या दोन तासातच अटक करण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे. आकाश मांजे (रा.खालिद ता. भिवंडी) असे हत्या झालेल्या वीट भट्टी कामगाराचे नाव असुन आकाशने भिवंडी येथील एका वीट उत्पादकाकडून आरोपी प्रल्हाद गावित याच्या ... Read More »

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

केवळ 800 रुपयांच्या वाटणीवरुन केला होता आईचा खून राजतंत्र न्युज नेटवर्क/ डहाणू, दि. 5 : केवळ 800 रुपयांच्या वाटणीवरुन उद्भवलेल्या वादातून आईचा खून करणार्‍या मुलाला न्यायालयाने 4 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. रमेश रामा कुवरा (वय 35) असे आरोपीचे नाव असुन 4 वर्षांपुर्वी कासा येथे ही घटना घडली होती. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवरा कुटूंबियांनी 2015 साली आपल्या मालकीतील ... Read More »

पालघर : घरफोडी करणारी टोळी अटकेत

12.5 लाखांचा ऐवज हस्तगत! राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 5 : येथील सातपाटी भागातील दोन घरांमध्ये रात्रीच्या सुमारास चोरी करुन लाखोंचे दागिने लंपास करणार्‍या चार जणांच्या टोळीला गजाआड करण्यात अखेर सातपाटी पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. या टोळीकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 12 लाख 49 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील महिन्यात सातपाटीतील दोन घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी ... Read More »

जव्हारमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी

हिन्दू बंधवांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत प्रतिनिधी/जव्हार, दि. 5 : प्रेम आणि बंधुभावाचे प्रतिक असलेली रमजान ईद जव्हारमध्ये आज, बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज झाल्यानंतर सर्वधर्मीयांनी एकमेकांना गुलाबपुष्प देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरातील व परिसरातील मुस्लिम बांधव बच्चे कंपनीसह नवीन पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुन्नी जामा मस्जिदचे मौलाना नौशाद यांनी, रमजानच्या काळात ज्यांनी ... Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोर्डी येथे खारफुटी संवर्धन

Share on: WhatsApp Read More »

Scroll To Top