दिनांक 30 May 2020 वेळ 9:22 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » June » 04

Daily Archives: 04/06/2019

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेलेल्या पाथर्डी गावाला मनसेचा मदतीचा हात

चार पाण्याच्या टाक्या बसवून ग्रामस्थांना दिला दिलासा केवळ आंदोलनापर्यंत मर्यादित न राहता शाश्‍वत स्वरूपाचे काम करणार -कुंदन संखे प्रतिनिधी/जव्हार, दि. 4 : पालघर जिल्ह्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची होरपळ सुरु असून, पिण्यासाठी पाणी मिळणे देखील दुरापास्त झाले आहे. ही भयावह परिस्थिती ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या जव्हारमधील पाथर्डी ... Read More »

खुपरीचा ’ताप’ जाता जाईना!

डेंग्यू तापाची साथ; आणखी 7 रूग्ण रूग्णालयात प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : तालुक्यातील खुपरी गाव तापाने फणफणले असून येथे डेंग्यूच्या रूग्णांच्या संख्येत आणखी वाढ होताना दिसत आहे. सोमवारी (दि. 3) वाडा ग्रामीण रूग्णालयात आणखी सात रूग्ण उपचारासाठी दाखल झाले असून आता त्यांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. खुपरी गावात 50 हुन अधिक जणांना तापाची लागण झाली असून त्यांच्यावर शासकीय व ... Read More »

नालासोपारा पोलीस स्टेशनच्या लाचखोर पोलीस उप निरीक्षकाला अटक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 4 : एका इसमावरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी तसेच त्याला जामीन मिळवून देण्यासाठी 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणारा नालासोपारा पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस उप निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. मागील महिन्यात नालासोपार्‍यातील कासा टेरेसा भागात राहणार्‍या एका 37 वर्षीय इसमावर एका प्रकरणात नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याच्यावरील ... Read More »

सापने गावातील उच्च विद्युत वाहिनीचे खांब जीर्ण!

मोठ्या अपघाताचा धोका! खांब त्वरीत बदलण्याची मागणी प्रतिनिधी/वाडा, दि. 4: तालुक्यातील सापने बु. या गावातील विजेचे खांब अत्यंत जुने झाले असल्याने ते जीर्ण झाले आहेत. तसेच गावाबाहेरून गेलेल्या 22 केव्ही उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे खांबही गंजले असून त्याला भगदाडे पडली आहेत. तर विजेच्या ताराही नेहमीच तुटत असल्याने मोठ्या अपघाताची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली असून हे जुने खांब त्वरीत बदलण्याची मागणी ... Read More »

वसईत 9.88 लाखांचा गुटखा पकडला

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 4 : ससुनवघर येथील एका घरातून पोलिसांनी 9 लाख 88 हजारांचा गुटखा जप्त केला असुन याप्रकरणी संबंधित इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार्‍या ससुनवघर गावातील एका घरात लाखो रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याची साठवणूक करुन ठेवली असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने काल, सोमवारी (दि.3) संध्याकाळच्या सुमारास सदर ... Read More »

Scroll To Top