दिनांक 27 May 2020 वेळ 5:51 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » June

Monthly Archives: June 2019

पालघरमध्ये झाडे उन्मळून घरांचे नुकसान, एक जखमी

वार्ताहर/बोईसर, दि. 30 : आज, रविवारी सकाळपासून कोसळणारा पाऊस व सोसाट्याच्या वार्‍यामुळे पालघरमध्ये चार ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये 6 घरांचे नुकसान झाले तर एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला आहे. पालघर जिल्ह्यात गुरुवार (दि.27) रात्रीपासुन सुरु झालेल्या पावसाने मागील तीन दिवसात जोर धरला असुन अनेक ठिकाणी पाऊस व सोसाट्याच्या वार्‍यामुळे झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अशाचप्रकारे पालघरमधील ढुंगीपाडा-खानपाडा, ... Read More »

कार्यकर्त्याने समाजातील दुर्बल घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक -बाबाजी काठोळे

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातील सर्वात दुर्बल घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटले पाहिजे व त्यासाठी कार्यकर्त्याने या दुर्बल घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व पालघर लोकसभेचे विस्तारक बाबाजी काठोळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 30) वाडा येथील जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. पक्षाची ध्येयधोरणे, आपल्या सरकारच्या योजना ... Read More »

विकास आराखड्यास वाडावासियांचा विरोध!

प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पालघर जिल्ह्यासाठी विकास आराखडा जाहीर केला असून त्यात वाडा तालुक्यातील 20 गावांत विकास केंद्रे निर्माण करण्याचे धोरण जाहीर केले आहे. परंतु या विकास आराखड्यातील तरतुदी स्थानिक जनतेला अत्यंत जाचक असून अन्यायकारक असल्याने त्याला विरोध करण्यासाठी वाड्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत स्थानिक सरपंच व लोकप्रतिनिधींनी विकास आराखड्याला एकमुखाने विरोध ... Read More »

जिओ केबलसाठी खोदाई, देवबांध-डोल्हारा घाटात रस्त्याचे कडे तुटले!

आदिवासींच्या शेतीचेही नुकसान, बांधकाम विभागाचा मज्जाव; तरीही खोदाई दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 28 : खोडाळा – मोखाडा दरम्यान रिलायन्स जिओ कंपनीचे भुमिगत केबल टाकण्याचे काम सरु आहे. यासाठी ठिकठिकाणी नव्याने मारलेली साईडपट्टी खोदण्यात आली आहे. तर धोकादायक वळणांवर देखील खोदाई करून केबल लाईन टाकण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याचे कडे तुटले असुन या रस्त्यावरून प्रवास करणे नवागतांसाठी अधिक ... Read More »

वाड्यात एकाच दिवशी दोन तरुणांची आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि. 28 : तालुक्यातील सारसी येथील विशाल ज्ञानेश्वर ठाकरे (वय 26) व कोने येथील धिरज नरेश अधिकारी (वय 22) या दोन तरुणांनी आज, शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वाडा तालुक्यातील सारसी येथील विशाल ठाकरे या तरुणाचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून त्याने आत्महत्या केली. तर ... Read More »

प्रलंबित मागण्यांसाठी जेष्ठ नागरिकांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

डहाणूतील जेष्ठ नागरिक झाले सहभागी प्रतिनिधी/डहाणू, दि. 28 : मागील 10 वर्षांपासून महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉन मुंबई यांच्यातर्फे काल, 27 जुन रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष अरुण रोठे, उपाध्यक्ष नाना इंगळे, अण्णासाहेब टेकाडे, फेस्कॉनचे अध्यक्ष चाबके, जनरल सेक्रेटरी अरुण कुलकर्णी, अ‍ॅस्कॉनचे ... Read More »

सेवा देणार्‍या प्रत्येकाने ग्राहकांचे हित जपावे!

राज्य सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांचे आवाहन राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 27 : ग्राहकांचे हित जपणे हे सेवा देणार्‍या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास ग्राहकांनी संबंधित विभागांच्या उपलब्ध क्रमांकावर तक्रार दाखल करावी आणि शासनाच्या संबंधित विभागांनी त्याची तात्काळ दखल घेऊन तक्रार निवारण करावे, अशी सूचना राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरूण देशपांडे यांनी केली. राज्य ग्राहक ... Read More »

वाड्यात तस्करांकडून खैर वृक्षांची कत्तल!

वन विकास महामंडळाचे दुर्लक्ष; गुन्हे दाखल करण्यात वन अधिकार्‍यांची दिरंगाई दिनेश यादव//वाडा, दि. 27 : एकीकडे सरकार कोट्यावधी वृक्षलागवडीचे धोरण अवलंबून वनसंवर्धनाचा प्रयत्न करत असताना हे धोरण राबविण्याची ज्या वन विकास महामंडळावर विशेष जबाबदारी आहे त्या महामंडळा अंतर्गत वाड्यातील संरक्षित वनक्षेत्रात तस्करांनी मोठ्याप्रमाणावर खैर वृक्षांची कत्तल करून लाखो रुपये किंमतीचा माल लंपास केला आहे. दरम्यान, या वृक्षतोडी संदर्भात महामंडळाच्या येथील ... Read More »

दुचाकी चोरटे गजाआड, तीन दुचाकी हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 27 : विरार येथून चोरीला गेलेल्या दुचाकीचा तपास करत स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने तीन जणांना अटक केली असुन त्यांच्याकडून अर्नाळा येथून चोरीला गेलेल्या दोन व काशिमिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेली एक, अशा एकुण 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. विरार पश्‍चिम भागात राहणार्‍या गंगाधर मधुकर पाटील यांची एम.एच.04/डी.एल. 6583 या क्रमांकाची पल्सर दुचाकी साई ... Read More »

वसईत साडेतीन लाखांचा गुटख्याचा साठा पकडला

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 27 : वसईतील कोळीवाडा येथील शेख चाळीत विक्रीसाठी साठवणूक करुन ठेवलेला विविध प्रकारचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटने छापा टाकून जप्त केला आहे. जप्त मुद्देमालाची बाजारभावानुसार 3 लाख 65 हजार रुपये ऐवढी किंमत असुन याप्रकरणी मुश्ताक रफिक मेमन (वय 50) या इसमाला अटक करण्यात आली आहे. काल, 26 जुन रोजी संध्याकाळी ... Read More »

Scroll To Top