दिनांक 21 September 2019 वेळ 6:22 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 19

Daily Archives: 19/05/2019

पावसाळी कामे करण्यासाठी महावितरणला ठेकेदार मिळेना

वार्ताहर/बोईसर, दि. 19 : पालघर व वसई सर्कलमध्ये महावितरण कंपनीने विद्युत उपकरणांची दुरुस्ती व डागडुजी करण्यासाठी तीन वर्षांच्या कंत्राटाबाबत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना अद्यापपर्यंत महावितरणला ठेकेदार मिळाला नसल्याचे समोर आले आहे. याविषयी महावितरणचे पालघर जिल्हा अभियंता किरण नागावकर यांच्याशी संपर्क साधला असता कामांचे दर वाढवल्याने या आठवड्यात ठेकेदार निविदा भरतील, अशी आशा असल्याचे त्यांनी सांगितले. ... Read More »

जिल्ह्यातील टंचाईवरील उपाययोजनांची पालक सचिवांनी केली पाहणी

जव्हार येथे घेतली आढावा बैठक पाणी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी गरजेनुसार टँकर उपलब्ध करून देणार! -पालक सचिव मनीषा वर्मा राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 19 : जिल्ह्यातील पाणी टंचाईवरील उपाययोजनांची आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव तथा पालघर जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीम. मनीषा वर्मा यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने पालघर जिल्ह्यातील पालघर, विक्रमगड आणि तलासरी तालुक्यात पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला ... Read More »

ट्रकखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : तालुक्यातील खानिवली येथून क्लास सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतत असताना मागून येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात कौशल दिनेश पाटील (वय15) या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. कौशल हा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून तो खानिवली येथे क्लासला जात होता. शनिवारी दूपारच्या सुमारास क्लास सुटल्यानंतर अंबिस्ते (जांभ्याचा पाडा) येथील आपल्या घरी परतत असताना पाठीमागून येणार्‍या एम.एच.05 के.8895 ... Read More »

Scroll To Top