दिनांक 21 September 2019 वेळ 6:17 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 17

Daily Archives: 17/05/2019

वाड्यात दुचाकी अपघातात 35 वर्षीय इसम जागीच ठार

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : तालुक्यातील खुपरी येथे झालेल्या अपघातात एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. दीपक श्रीधर वावरे (वय 35, रा.जामघर) असे सदर इसमाचे नाव असून ते विलास परशुराम बहारे याच्यासोबत एम.एच.04/ ई.ए.5951 या क्रमांकाच्या दुचाकीवरून कुडूस येथील आठवडा बाजारात खरेदीसाठी गेले होते. बाजारहाट करून घरी परतत असताना मागून येणार्‍या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ... Read More »

वाडा : विद्युत खांबांना लाकडी बांबूंचा आधार

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : तालुक्यातील कांबारे ग्रामपंचायत हद्दीतील साठेपाडा ते जाधवपाडा दरम्यान वीजवितरण कंपनीने टाकलेल्या विद्युतवाहक लाईनची अत्यंत दुरावस्था झाली असून ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही वीज वितरण कंपनी याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे. तर या लाईनसाठी वापरण्यात आलेले सिमेंटचे खांब जीर्ण झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून स्थानिक नागरिकांनी अशा खांबांना पर्यायी लाकडी बांबूंचा आधार दिला आहे. कांबारे ... Read More »

अखेर वादग्रस्त वनअधिकारी दिलीप तोंडे यांची बदली

श्रमजीवी संघटनेच्या आंदोलनाला आले यश प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : शासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत खड्डे खोदण्याचे काम केलेल्या, मात्र या कामाची मजूरी न मिळाल्याने यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासी मजुरांवर पिस्तुल रोखून धमकावल्याचा कथित आरोप असलेले प्रभारी वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप तोंडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेने तोंडे यांच्या कार्यशैलीविरोधात गेल्या सोमवारी (दि. 13) वाडा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आसूड ... Read More »

वसईत 5 लाखांच्या वीजचोरीप्रकरणी गुन्हे दाखल

राजतंत्र न्युज नेवटर्क/वसई, दि. 17 : पालघर जिल्ह्यातील विविध भागात महावितरणतर्फे वीज चोरी करणार्‍यांविरोधात धडक मोहिम राबविण्यात येत असुन यामाध्यमातून लाखोंचा दंड तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत वसई तालुक्यातील महावितरणच्या गोखिवरे व जुचंद्र कार्यालयातर्फे सुमारे 4 लाख 90 हजारांच्या वीजचोरीप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणचे वसई पुर्वेतील गोखिवरे कार्यालयाचे सहाय्यक अभियंता यांनी या मोहिमेंतर्गत ... Read More »

चारित्र्याच्या संशयातून छळ, महिलेची मुलासह आत्महत्या

विरार-वैतरणादरम्यान रेल्वेसमोर उडी घेऊन संपवले आयुष्य राजतंत्र न्युज नेवटर्क/विरार, दि. 17 : चारित्र्याच्या संशयातून पतीकडून होणार्‍या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या मुलासह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदर विवाहितेने विरार-वैतरणादरम्यान रेल्वेसमोर उडी घेऊन आपले व पोटच्या मुलाचे आयुष्य संपवले. मृत महिलेच्या वडिलांनी विरार पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील मुरवड येथे राहणार्‍या सदर महिलेचे 4 वर्षांपुर्वी विरार ... Read More »

राज्यातील तापमानात वाढ होणार, लोकांना काळजी घेण्याचे आवाहन

राजतंत्र न्युज नेवटर्क/मुंबई, दि. 17 : राज्यातल्या बर्‍याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे राज्यातील नागरीकांनी आपली काळजी घेण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बर्‍याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. या दरम्यान अकोला, नागपूर ... Read More »

Scroll To Top