दिनांक 26 May 2020 वेळ 8:35 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 15

Daily Archives: 15/05/2019

पालघर जिल्ह्यातील थोडक्यात महत्वाच्या बातम्या. (दि. 15/5/2019)

कासा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार डहाणू, दि. 15 : तालुक्यातील कासा येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला जिवेठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करणार्‍या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासुन आरोपी इसम पीडित मुलीसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यातच गेल्या शुक्रवारी (10 मे) रात्री 10 वाजेच्या सुमारास पीडित मुलगी एकटीच असल्याचा फायदा आरोपीने तिच्यावर ... Read More »

व्यवस्थापकाचे अपहरण व खून प्रकरण, आणखी 7 आरोपींना अटक

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : पालघर येथील अल्फा मेटल कंपनीचे व्यवस्थापक आरिफ मोहम्मद अली शेख यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आज, बुधवारी आणखी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. तर यापुर्वी चार जणांना पोलिसांनी अटक केली असुन चौघांनाही न्यायालयाने 22 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 9 मे रोजी रिक्षातून आपल्या कंपनीमध्ये जात असताना याच कंपनीत ... Read More »

चुलत भावाचा खून करणार्‍या आरोपीला आजन्म तुरुंगवास

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : अज्ञात कारणावरुन आपल्या चुलत भावाचा हातोडीने डोक्यात हल्ला करुन निर्घण खून करणार्‍या आरोपीला न्यायालयाने आजन्म तुरुंगवास व 10 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. इन्कलाब दुखलाख शेख (वय 34) असे सदर आरोपीचे नाव असुन 6 वर्षांपुर्वी ही घटना घडली होती. नवी मुंबईतील गोवंडी येथील रहिवासी असलेला इन्कलाब शेख 19 ऑगस्ट 2013 रोजी आपल्या नालासोपारा ... Read More »

उत्तर प्रदेशातुन अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका

तुळींज पोलिसांची कर्तव्यदक्ष कामगिरी राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : उत्तर प्रदेश राज्यातून अपहरण करुन आणलेल्या 2 अल्पवयीन मुलींची तुळींज पोलिसांनी काही तासांतच सुखरुप सुटका केली आहे. तसेच याप्रकरणी अभिजीत यादव नामक अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली असुन त्याची चौकशी सुरु आहे. , मंगळवारी (दि. 14) संध्याकाळी 5.20 च्या सुमारास तुळींज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेंद्र शिवदे यांना अभिजीत यादव ... Read More »

Scroll To Top