दिनांक 26 May 2020 वेळ 9:33 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 12

Daily Archives: 12/05/2019

रसायन प्रक्रियेदरम्यान वायुगळती; तारापूर एमआयडीसीतील तीन कामगारांचा मृत्यू

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : चार दिवसांपूर्वीच विषारी वायू गळती होऊन 30 कामगारांना बाधा झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा तारापूर एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या कामगारांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी करणार्‍या डॉक्टरांनाही वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु ... Read More »

विनापरवाना रेती वाहतुक, 30 टन रेतीसह दोघांना अटक

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 12 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पोलिसांनी विनापरवाना रेती वाहतुक करणार्‍या एका ट्रकवर कारवाई करत 30 टन रेती जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी ट्रकचा चालक व क्लिनरला अटक करण्यात आली असुन दोघांसह ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास महामार्गावरील वडवली गावच्या हद्दीतील झायका हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. एम.एच. 39/टी. 5131 या ... Read More »

महिलेचा विनयभंग करणार्‍या आरोपीला 5 वर्षांची शिक्षा

वसई, दि. 12 : एका महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणार्‍या आरोपीला न्यायालयाने 5 वर्षे तुरुंगवास तसेच 15 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. यशवंत आत्मताराम ठाकुर असे सदर आरोपीचे नाव आहे. वसई तालुक्यातील पणजुगावात राहणार्‍या 46 वर्षीय यशवंत ठाकुरने 16 एप्रिल 2014 रोजी आपल्या मैत्रीणींसोबत एक कार्यक्रम बघण्यासाठी चाललेल्या पीडित महिलेला अंधारात खेचुन तिच्याबरोबर अश्‍लिल चाळे केले होते. यानंतर ... Read More »

डहाणू तालुक्याला पुन्हा भुकंपाचे सौम्य धक्के!

वार्ताहर/बोईसर, दि. 12 : पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी तालुक्यातील काही गावांमध्ये सततच्या बसणार्‍या भूकंपाच्या धक्क्यांनी मागील काही दिवसांपासुन विश्रांती घेतल्याने येथील नागरीकांमधील भीतीचे वातावरण काहीप्रमाणात निवळले होते. मात्र काल, शनिवारी रात्रीपासुन रविवार सकाळपर्यंत डहाणू तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा भुकंपाचे 7 ते 8 सौम्य धक्के बसल्याचे कळते. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, बहारे, वंकास, चिंचले, हळदपाडा, आंबोली, सासवद, शिलोंढे आदी गाव पाड्यांना ... Read More »

वज्रेश्वरी देवी मंदिरात धाडसी दरोडा, आठ ते दहा लाखांचा ऐवज चोरला

प्रतिनिधी/कुडूस, दि. 12 : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी देवी मंदिरात शुक्रवारी पहाटे दरम्यान पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने देवीच्या मुख्य गाभार्‍यातील तीन दानपेट्या आणि दुसर्‍या गाभार्‍यातील दोन दानपेट्या फोडून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांची रक्कम चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली असून मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शुक्रवारी पहाटे तीन ते साडे तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सहा ... Read More »

Scroll To Top