दिनांक 26 May 2020 वेळ 8:31 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 07

Daily Archives: 07/05/2019

जव्हार तालुक्यातील 23 गावपाड्यांत पाणीटंचाई

6 टँकरने पाणी पुरवठा सुरु! 4 गावांचे टँकरसाठी नवीन प्रस्ताव प्रतिनिधी/जव्हार, दि. 7 : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाणी टंचाईच्या झळा अधिक वाढल्या असून या वर्षी तालुक्यातील 23 गाव-पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. दरम्यान या टंचाईग्रस्त गावपाड्यांमध्ये 6 टँकरने दिवसाआड प्रमाणे पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर आणखी 4 टंचाईग्रस्त गावांचे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव ... Read More »

चोरीच्या संशयातून मारहाण, कासा येथील दाम्पत्याला 1 वर्षाची शिक्षा

राजतंत्र न्युज नेटवर्क/कासा, दि. 7 : चोरीच्या संशयातून निष्पाप मुलाला बेदम मारहाण करणार्‍या एका दाम्पत्याला न्यायालयाने 1 वर्ष कारवास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आनंता नथु शेलका (वय 42) व सुरेखा आनंता शेलका (वय 38) अशी सदर दाम्पत्याची नावे आहेत. विक्रमगड तालुक्यातील कोडंगाव (शेलकेपाडा) येथे शेलका दाम्पत्याचे किराणा मालाचे दुकान असुन 28 जुलै 2016 रोजी पावसापासुन वाचण्यासाठी ... Read More »

खोदकामादरम्यान दागिने मिळाल्याचे सांगुन फसवणूक करणारे जोडपे गजाआड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 7 : खोदकाम करताना सोन्याचे दागिने मिळाल्याचे सांगुन खोटे सोने विक्री करून फसवणुक करणार्‍या जोडप्याला वालीव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. रविवारी (दि. 5) येथील पेल्हार फाटा परिसरातील प्रभात पेट्रोल पंपाच्या बाजुला दोन पुरुष व एका महिलेने एका इसमाला गाठून आम्हाला खोदकाम करत असताना सोन्याचे दागिने मिळाल्याचे सांगुन आता हे सोने आम्हाला विक्री करायचे आहे, ... Read More »

तारापुर अणुउर्जा प्रकल्पाचे कर्मचारी पाळणार काळा दिवस

एनपीसीआयएल मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वार्ताहर/बोईसर, दि. 7 : न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआयएल) व्यवस्थापन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत या निषेधार्थ तारापूर अणुऊर्जा केंद्राचे कर्मचारी उद्या, बुधवारी (8 मे) काळा दिवस पाळणार आहेत. येथील कर्मचार्‍यांना भेडसावत असलेल्या विविध समस्या तसेच इतर मागण्यांसंदर्भात अणुऊर्जा केंद्रातील कर्मचार्‍यांच्या असोसिएशनने एनपीसीआयएलच्या व्यवस्थापन प्रतिनिधींची भेट घेऊन अनेकदा कर्मचार्‍यांचे प्रश्न निदर्शनास ... Read More »

पत्नीला पेटवून देणार्‍या पतीला 15 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 7 : घरगुती भांडणातून पत्नीला जिवंत जाळून ठार मारणार्‍या पतीला न्यायालयाने 15 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. गुलाब देवराम चव्हाण (वय 24) असे आरोपी पतीचे नाव असुन 4 वर्षांपुर्वी ही घटना घडली होती. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पश्‍चिम भागात रहावयास असलेल्या गुलाब चव्हाण व त्याच्या पत्नीमध्ये लग्नाच्या काही महिन्यानंतर नेहमी कोणत्याना कोणत्या कारणांवरुन भांडण होत ... Read More »

Scroll To Top