दिनांक 26 May 2020 वेळ 9:39 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 06

Daily Archives: 06/05/2019

पाचघर गाव तहानेने व्याकुळ, हंडाभर पाण्यासाठी जागून काढावी लागतेय रात्र

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या पाचघर गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी महिलांना रात्र जागून काढावी लागत आहे. त्यामुळे महिलांना संपुर्ण दिवसच पाण्यासाठी खर्ची करावा लागत आहे. येथील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन लवकरात लवकर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागील वर्षी परतीच्या पावसाने दडी मारल्याने तालुक्यात मोठ्या ... Read More »

अवैध दारु वाहतुकीवर कारवाई, 37 हजारांचा मुद्देमाल जप्त

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 6 : तलासरी व कासा येथे पोलिसांनी अवैधरित्या दारु वाहतूक करणार्‍या दोन कारवर कारवाई करत विविध प्रकारची एकुण 37 हजार 440 रुपयांची दारु जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल केले असुन अधिक तपास सुरु आहे. तलासरीतील दापचरी भागात शनिवारी (दि. 4 मे) पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एम.एच.04/सी.बी. 7841 या क्रमांकाच्या कारमध्ये 25 हजार ... Read More »

डहाणू-विरार लोकलमध्ये महिलेने दिला मुलीला जन्म!

वार्ताहर/बोईसर, दि. 6 : आज, सोमवारी सकाळी सफाळे येथील एका 20 वर्षीय महिलेने डहाणू-विरार लोकलमध्ये बाळाला जन्म दिला. सोनी अजय पटेल असे सदर महिलेचे नाव असुन प्रसुतीनंतर तिला विरार येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनी पटेल ही महिला आज, सोमवारी सकाळी आपल्या पतीसोबत काही कामानिमित्त विरार येथे जात असताना डहाणू-विरार लोकलमध्येच तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. 11 वाजुन ... Read More »

वाड्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच!

डझनभराहून अधिक घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असुन सोनाळे परिसरात शनिवारी (दि. 4) रात्री एकाच वेळी डझनभर घरे चोरट्यांनी फोडून साधारण 61 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याच्या घटनेनंतर काल, रविवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी वाडा शहरातील शिवाजी नगर परिसरात दोन घरफोड्या करून हिरे व सोन्याचे दागिने, असा एकूण साडेपाच लाखांचा ऐवज ... Read More »

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी राज्यातील आदर्श आचारसंहिता शिथिल

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य राजतंत्र न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 06 : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी, याकरीता लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात लागू असलेली आदर्श आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून यासंदर्भात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्यात ... Read More »

पॉईंट ब्रेक ऍडवेन्चर्स टीमची वजीर सुळक्यावर यशस्वी चढाई

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : निसरडी गवताळ पाऊलवाट, 90 अंशातील सरळ उभी चढाई, पूर्वेकडे जवळपास सहाशे फूट खोल दरीचा उतार आणि पाण्याची प्रचंड कमतरता, असा माहुली किल्ल्याचा एक चित्तथरारक अनुभव देणारा भाग असलेल्या वजीर सुळक्यावरील अतिकठीण चढाईची मोहीम पॉईंट ब्रेक ऍडवेन्चर्स टीमने फत्ते केली आहे. शहापूर तालुक्यात असलेला माहुली किल्ला हा दुर्गप्रेमींसाठी नेहमीच एक पर्वणी ठरत असतो आणि म्हणूनच या किल्ल्याची ... Read More »

अर्नाळा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हरवलेली दोन मुले पुन्हा पालकांकडे

सोशल मीडियाने बजावली मोलाची भुमिका राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 5 : येथील आगाशी परिसरात हरवलेल्या दोन राजस्थानी मुलांना अर्नाळा पोलिसांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा पालकांकडे स्वाधिन करण्यात आले आहे. अर्नाळा पोलिसांच्या या कामगिरीत सोशल मिडीयानेही मोलाची भुमिका बजावली असुन राजस्थान पोलिसांनी सोशल मिडीयावर सदर मुलांचे फोटो व्हायरल केल्यामुळे त्यांच्या पालकांचा शोध लागण्यास मोठी मदत झाली. बुधवारी 1 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या ... Read More »

Scroll To Top