दिनांक 26 May 2020 वेळ 8:11 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 03

Daily Archives: 03/05/2019

पत्रकार तेजस हरडची गरूडझेप; ऑक्सफोर्ड विद्यापीठात संशोधनासाठी रॉयटर्सची फेलोशिप

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : तालुक्यातील बुधावली या खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेला तेजस आज इकनॉमिक अँड पॉलिटिकल विकली या मासिकासाठी प्रुफ रीडर म्हणून काम करत आहे. लहानपणी गावात पेपरही वाचायला मिळत नसे. अशा परिस्थितीतून शिकलेल्या तेजसला अलिकडेच रॉयटर्स या नामवंत आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेची फेलोशिप मिळाली आहे. या फेलोशिपअंतर्गत इंग्लंडमधल्या ऑक्सपोर्ड विद्यापीठात माध्यमांशी निगडीत संशोधन करण्याची संधी त्याने मिळवली आहे. यामुळे तेजसचे ... Read More »

सेफ्टी टँकची सफाई करताना तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 3 : येथील एका इमारतीच्या सेफ्टी टँकची सफाई करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा विषारी वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनिल चावरीया, बरिका कॅसन बुंबक व प्रदीप सरवटे मियासन अशी मृत कामगारांची नावे असुन याप्रकरणी इमारतीचा बिल्डर व सुपरवायझरसह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल, 2 मे रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास नालासोपारा पश्‍चिमेकडील निलमोरे ... Read More »

मोखाड्याची भीषण पाणी टंचाईकडे वाटचाल!

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा वाढलेल्या लोकसंख्येला तुटपुंजा पाणीपुरवठा प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईने अधिकच भीषण रुप घेतले असुन सध्यस्थितीत 86 गावपाड्यांना सन 2011 च्या लोकसंख्येनुसार 24 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. शासनाने निर्धारित केलेले प्रति व्यक्ती 20 लीटर एवढे तुटपुंजे पाणी त्यातच आठ वर्षात वाढलेली लोकसंख्या यामुळे सरकारकडून होणारा पाणी पुरवठा तुटपुंजा पडत आहे. ... Read More »

वसई : घरफोडी करणारे चार सराईत चोरटे गजाआड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 3 : तालुक्यातील विविध भागात दिवसा व रात्री घरफोड्या करुन धुमाकुळ घालणार्‍या चार जणांच्या टोळीला वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गजाआड केले आहे. या टोळीच्या चौकशीतून एकुण 10 गुन्हे उघडकीस आले असुन 1 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वालीव पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या चोरींच्या घटनांच्या पार्श्‍वभुमीवर वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण ... Read More »

दरोड्याच्या तयारीतील सशस्त्र टोळी जेरबंद

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 3 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या 7 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. तीन विविध वाहनांतून आलेल्या या दरोडेखोरांकडून गावठी कट्ट्यासह अनेक घातक हत्यारे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. वालीव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास चौगुले यांना महामार्गावरील वसई हद्दीतील सातिवली ब्रिजच्या बाजुला असलेल्या सागर पेट्रोल पंपावर 1 मे रोजी रात्रीच्या ... Read More »

Scroll To Top