दिनांक 26 May 2020 वेळ 9:21 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » May » 02

Daily Archives: 02/05/2019

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार, आरोपी तरुणाला अटक

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : लग्नाचे अमिष दाखवून 20 वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार वाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असुन याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे मागील काही महिन्यांपासुन तालुक्यातील पालसई येथील एका 21 वर्षीय तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे समजते. 7 मार्च रोजी सदर तरुणाने फोन करून आपण पळून जाऊन लग्न करू, असे सांगून ... Read More »

नालासोपार्‍यातून 3 बांगलादेशी नागरिकांना अटक

राजतंत्र न्युज नेटवर्क/नालासोपारा, दि. 2 : पारपत्राशिवाय भारतात घुसखोरी करुन बेकायदेशिरित्या नालासोपार्‍यात स्थायिक झालेल्या 3 बांगलादेशी नागरीकांना अनैतिक मानवी वाहतुक शाखेच्या पथकाने अटक केली असुन त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. पालघर जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यात बेकायदा राहणार्‍या परदेशी नागरिकांच्या विरोधात अटकेची मोहीम सुरू केली असुन या मोहिमेअंतर्गत नालासोपारा पश्‍चिमेतील टाकीपाडा परिसरात राहणार्‍या विपुल युनुस मिया (वय 24), नासिर हुसेन ईस्माईल शेख ... Read More »

जागतिक कामगारदिनीच कामगाराची आत्महत्या

प्रतिनिधी/वाडा, दि.2 : तालुक्यातील मांडा – केळीचापाडा येथील पटवारी बेकर्स या पारले जी बिस्किटांचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीतील एका कामगाराने आर्थिक अडचणीमुळे कंपनी आवारातच आत्महत्या केल्याची घटना ऐन जागतिक कामगार दिनीच घडली आहे. मोहित नंदलाल गुप्ता उर्फ भुजवा (वय 31) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव असुन मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या मोहितने कंपनी आवारातील कामगार कॉलनीमध्ये ज्वलनशील रसायन अंगावर ओतून स्वतःला जाळून ... Read More »

आगीत जळून खाक झालेल्या घरांची आमदार शांताराम मोरेंकडून पाहणी

सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : तालुक्यातील ऐनशेत गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कातकरी वस्तीमधील दोन घरे जळून खाक झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) सायंकाळच्या सुमारास घडली होती. आगीत घरातील कपडेलत्ते, धान्य, भांडी आदी वस्तुंसह संपुर्ण घर जळून खाक झाल्याने अंदाजे एक लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी वाडा ... Read More »

अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून, आरोपी 24 तासात गजाआड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 2 : येथील एका 27 वर्षीय महिलेचा गळा चिरुन खून करणार्‍या आरोपीला 24 तासात अटक करण्यात विरार पोलिसांना यश आले असुन मृत महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार पुर्वेतील साईनाथनाका भागात राहणार्‍या मयुरी महेश मोरे या महिलेचा 28 एप्रिल रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास राहत्या घरात ... Read More »

अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : तालुक्यातील डाहे ग्रामपंचायतीच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दीपक रमेश बरफ (वय 21, रा.सोनशिव) असे सदर तरुणाचे नाव असुन पीक ते वाडा दरम्यान असलेल्या डाहे येथे हा अपघात घडला. दीपक भरधाव वेगात वाड्याच्या दिशेने येत असताना डाहे येथे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट रस्त्याच्या कडेला ... Read More »

Scroll To Top