दिनांक 30 May 2020 वेळ 9:23 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » May

Monthly Archives: May 2019

डहाणू तालुक्यात पुन्हा 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप

12 किलोमीटरचे क्षेत्र प्रभावित, 7 हून अधिक गावे हादरली वार्ताहर/बोईसर, दि. 31 : मागील काही महिन्यांपासुन अधुनमधुन हजेरी लावणार्‍या भुकंपाने आज पुन्हा डहाणू व तलासरी तालुक्यात हजेरी लावत येथील नागरीकांमधील भीती कायम ठेवली आहे. आज दुपारी जाणवलेल्या भुकंपाच्या धक्क्याने या तालुक्यांमधील 7 हून अधिक गावे हादरली आहेत. डहाणू व तलासरी तालुक्यात मागील वर्षापासून भूकंपाचे धक्के बसत असून आजपर्यंत येथे तब्बल ... Read More »

पेट्रोल पंपाच्या कार्यालयात चोरी करणारे तिघे अटकेत

11.22 लाखांची रोख रक्कम केली होती लंपास राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 31 : नालासोपारा पुर्वेतील एका पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची ग्रील कापुन कार्यालयातील 11 लाख 22 हजार रुपयांची रोकड लंपास करणार्‍या तीन चोरट्यांना गजाआड करण्यात तुळींज पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी 4 लाख 43 हजारांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले ... Read More »

किनारपट्टीवर संशयित बोट आढळल्याच्या अफवेवर विश्‍वास न ठेवण्याचे आवाहन

किनार्‍यावर सुरक्षारक्षक तैनात! अप्पर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण यांची माहिती! वार्ताहर/बोईसर, दि. 31 : पालघर जिल्ह्यातील समुद्र हद्दीत संशयास्पद बोट आढळून आली आहे, अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. मात्र अशी कोणतीही संशयास्पद बोट सागरी किनारी आढळून आली नसल्याचे पालघर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर समुद्रात अशा काही संशयास्पद हालचाली आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करतानाच सतर्कतेचा इशाराही पोलिसांमार्फत देण्यात ... Read More »

खोडाळा : कार्यकारी अभियंत्यांच्या शिष्टाईनंतर उपोषणातील पाणी थंडावले!

बंधार्‍याची प्राधान्यक्रमाची कामे मार्गी लावणार लेखी आश्वासनानंतर उपोषण तहकुब प्रतिनिधी/खोडाळा, दि. 30 : ऐन पाणी टंचाई हंगामात येथील बंधार्‍याच्या नुतनीकरणात चालढकल होत असल्याचा आरोप करत खोडाळा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आज, गुरूवारी बंधार्‍याच्या आवारात उपोषणास बसले होते. परंतू सायंकाळी उशीरा कार्यकारी अभियंता तुषार दापोलीकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन 25 जुन अखेर गाळ काढणे, खोलीकरण करणे, सांडवा करणे आदी प्राधान्यक्रमाची कामे मार्गी ... Read More »

डाकिवली येथे तीन घरे फोडली!

वाड्यात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : बुधवारी मध्यरात्री 3 घरांच्या खिडक्यांचे ग्रील तोडून झोपण्याच्या खोलीत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना वाडा तालुक्यातील डाकिवली (घरत पाडा) येथे घडली. बुधवारी रात्री डाकिवली चांबळे रस्त्यावरील घरत पाड्यात राहणार्‍या सी. टी. पाटील, दयानंद पाटील व भगवान पाटील यांच्या घरांमध्ये मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास ... Read More »

कोकाकोला कंपनीचे पाणी बंद करा, पाणीटंचाई आढावा बैठकीत मागणी

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : राज्यासह वाडा तालुक्यात तीव्र पाणी टंचाई असताना कोकाकोला कंपनी आपल्या व्यवसायाकरीता मोठ्या प्रमाणात गांध्रे ग्रामपंचायत हद्दीतील बंधार्‍यातून पाणी उपसा करत आहे. त्यामुळे या कंपनीला बंधार्‍यातून पाणी उचलण्यास बंदी करावी, अशी मागणी गांध्रे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुण पाटील यांनी तालुक्याच्या पाणी टंचाई संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केली. भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी वाडा तालुक्यातील ... Read More »

सुनावणीसाठी आणलेल्या कैद्यांचा पोलीस वाहनात गोंधळ!

5 जणांविरोधात गुन्हा, सरकारी वाहनाचे केले नुकसान, 1 कैदी जखमी राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 30 : नातेवाईकांनी आणलेला जेवणाचा डब्बा पोलिसांनी घेऊ न दिल्याचा आरोप करत 5 कैदांनी पोलीस वाहनातच मोठा गोंधळ घातल्याची घटना वसई येथे घडली आहे. या गोंधळात कैद्यांनी सरकारी वाहनाचे मोठे नुकसान केले असुन यात एक कैदी जखमी झाला आहे. काल, 29 मे रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून ... Read More »

मोटारसायकल अपघातात दोन ठार, एक जखमी

  डहाणू दि. २९: येथील सागरी महामार्गावरील डहाणू खाडी पुलाजवळ, दोन मोटरसायकलची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात, दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.              सागरी महामार्गावरील डहाणू खाडी पुलाजवळ, सोमवारी डहाणू औष्णिक विज केंद्राची राख व सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात कैलास जगदीश तांडेल (वय ... Read More »

तारापूर : वर्षा ऑर्गेनिक्स कंपनीत भीषण स्फोट, 4 कामगार जखमी

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : तारापुर औद्योगिक वसाहतीत (एमआयडीसी) अपघातांची मालिका सुरुच असुन आता वर्षा ऑर्गेनिक्स या रासायनिक कारखान्यात सोमवारी रात्री झालेल्या स्फोटात 4 कामगार जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की औद्योगिक वसाहतीच्या सुमारे 5 किलोमीटर अंतरावरील परिसर स्फोटाच्या धक्क्याने हादरला. या स्फोटात जखमी झालेल्या चौघांपैकी दोघे गंभीर जखमी असुन त्यांना मालाड येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले ... Read More »

डहाणू : सासरी परतण्यास नकार, पत्नीचा केला खून!

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 28 : माहेरी आलेल्या पत्नीने सासरी परतण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिचा लाकडी चोपणीने डोक्यात प्रहार करुन खून केल्याची घटना घडली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणूतील रायतळी दळवीपाडा येथे माहेर असलेली सदर महिला पतीसोबत वाद झाल्याने काही दिवसांपुर्वी माहेरी आली होती. त्यामुळे तिचा पती 26 मे रोजी तिला घरी घेऊन येण्यासाठी रायतळी दळवीपाडा येथे आला ... Read More »

Scroll To Top