दिनांक 25 August 2019 वेळ 1:59 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 17

Daily Archives: 17/04/2019

मत मागण्यापूर्वी उमेदवारांनी उत्तरे द्या; मोखाडा भू-पाणी हक्क संघर्ष समितीची अट

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मोखाडा, दि. 17 : येत्या लोकसभा निवडणूकीसाठी मते मागण्यासाठी मोखाडा तालुक्यात जाताना उमेदवारांना प्रथम काही प्रश्नांची लेखी उत्तरे द्यावी लागणार आहेत. मोखाडा भू-पाणी हक्क संघर्ष समितीने तशी अट टाकली असून गावाच्या वेशीवर याबाबतचा फलक लावला आहे. त्यांचे प्रश्न असे आहेत :- दमणगंगा – वैतरणा – गोदावरी नदीजोड प्रकल्पाला तुम्ही विरोध करता का? तुम्ही सत्तेत आलात तर सदर प्रकल्प ... Read More »

डहाणू : ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. विजय चोरडिया

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. १७ : येथील डहाणू व तलासरी तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विजय चोरडिया तर सेक्रेटरीपदावर ॲड. शेखर जोशी यांची एकमताने निवड झाली आहे. काल (मंगळवार) डहाणू येथील न्यायालयात झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डहाणू न्यायालय व ॲडव्होकेट बार असोसिएशनला मोठी ऐतिहासिक परंपरा असून १९५१ पासून वकिली करणारे असोसिएशनचे सर्वात ज्येष्ठ सदस्य विधिज्ञ ... Read More »

जव्हार व डहाणू आदिवासी प्रकल्पातील घोटाळ्यांची मालिका संपेना!

आणखी पावणे दोन कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी गुन्हे दाखल! राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : जव्हार व डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात 2004 ते 2009 दरम्यान आदिवासींसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमधील कोट्यावधींच्या घोटाळ्यांची अनेक प्रकरणे मागील काही दिवसांपासुन उजेडात येत असुन आता आणखी पावणे दोन कोटींच्या घोटाळ्यांप्रकरणी संबंधित अधिकारी व संस्थांविरोधात काल, मंगळवारी जव्हार व डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले ... Read More »

महावीर जयंती निमित्त मोखाड्यात धान्यवाटप

आशाये ग्रुप व डॉ. कडव यांचा संयुक्त उपक्रम प्रतिनिधी/मोखाडा, दि. 17 : महावीर जयंतीचे औचित्त्य साधून तालुक्यातील मारूतीचीवाडी परिसरातील तीन गावपाड्यांना ठाणे – नौपाडा स्थित आशाये ग्रुप व डॉ. मिठाराम कडव यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यवाटप करण्यात आले. मारूतीचीवाडी व बोरशेती परिसरातील 151 कुटूंबांनी या धान्यवाटपाचा लाभ घेतला. मोखाडा तालुक्यातील निष्कांचन परिस्थिती लक्षात घेऊन ग्रुपचे परेशभाई गाला व कृणाल विसरीया यांनी ... Read More »

कुणबी समाज काँग्रेसच्या पाठीशी -सुरेश टावरे

प्रतिनिधी/वाडा, दि. 17 : भिवंडी लोकसभा मतदार संघातील कुणबी समाज हा कायम काँग्रेस विचारधारेशी जोडलेला आहे. स्वार्थासाठी कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील काँग्रेस पक्ष सोडून विरोधकांना मिळाले असले तरी हा समाज मात्र आपल्या पाठीशी असल्याचे उद्गार काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी वाडा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात काढले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, बहुजन विकास आघाडी, रिपाई (कवाडे गट) आघाडीचे उमेदवार सुरेश ... Read More »

Scroll To Top