दिनांक 21 October 2019 वेळ 3:49 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 12

Daily Archives: 12/04/2019

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जव्हार आगारातून 6 ज्यादा बसेस

प्रतिनिधी/जव्हार, दि. 12 : सुट्ट्या व गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन एसटी महामंडळातर्फे राज्यभरात जादा एसटी बसेस सोडण्यात येत असुन जव्हार एसटी आगारातूनही 6 ज्यादा बसेस सोडण्यास सुरुवात झाली आहे. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी अशी ओळख असलेली एसटी बस दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करीत असते. सामान्य, गरीब व शेतकर्‍यांसाठी हक्काचे प्रवासाचे साधन म्हणजे एसटी. पालघर जिल्ह्यातील जव्हार एसटी ... Read More »

चोरीच्या धक्क्याने व्यापार्‍याचा मृत्यू

गोर्‍हे येथील घटना; बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन निषेध प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन गोर्‍हे-सांगे परिसरात गुरूवारी रात्रीच्या सुमारास एक किराणा दुकान व दोन घरे फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. आज सकाळीच चोरी झालेल्या दुकानाचे मालक प्रकाश खिलारे हे दुकान उघडण्यासाठी गेले असता आपले दुकान फोडलेले दिसल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन जागीच त्यांचा मृत्यू ... Read More »

तलासरीत नाकाबंदीदरम्यान लाखोंचा गुटखा व रेती जप्त

एकुण 6 जणांविरोधात गुन्हा दाखल राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. 12 : तलासरी पोलीसांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नाकाबंदी दरम्यान अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमधुन 4 लाख 90 हजार रुपयांचा गुटखा तसेच रेतीवाहतूक करणार्‍या एका ट्रकमधुन 30 हजार रुपयांची रेती जप्त केली आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्सचालक व त्याचे 4 साथिदार तसेच ट्रकचालक अशा एकुण 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... Read More »

सराईत चोरट्यांची टोळी गजाआड, चोरी व घरफोडीचे 20 गुन्हे उघड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 12 : वसई तालुक्यातील विविध भागात घरफोड्या, मोबाईल व वाहनांची चोरी करुन धुमाकुळ घालणार्‍या सराईत चोरट्यांच्या टोळीला गजाआड करण्यात विरार पोलीसांच्या पथकाला यश आले असुन या चोरट्यांकडून एकुण 4 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विरार पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी व चोरींच्या वाढत्या घटनांच्या पार्श्‍वभुमीवर पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक तयार करण्यात आले ... Read More »

Scroll To Top