दिनांक 21 October 2019 वेळ 3:47 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 04

Daily Archives: 04/04/2019

वाड्यात चोरट्यांचा धुमाकुळ, पुन्हा साडेपाच लाखांची घरफोडी

प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : आठवडाभरापूर्वीच तालुक्यातील खंडेश्वरी नाका येथील एका घरात घरफोडी करुन 1 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याची घटना ताजी असतानाच खुपरी येथे पुन्हा घरफोडीची घटना घडली असुन चोरट्यांनी येथून 5 लाख 60 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोडीचे सत्र सुरुच ठेवल्याने वाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ... Read More »

पालघर जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 4 : निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवार दि. 29 एप्रिल रोजी पालघर लोकसभा मतदार संघासाठी निवडणुक होत आहे. त्यामुळे मतदार संघातील सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, विविध खाजगी आस्थापना, दुकाने, निवासी हॉटेल, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक ... Read More »

वाड्यात सोनसाखळी चोरटा गजाआड

प्रतिनिधी/वाडा, दि. 4 : रस्त्याच्या कडेला बसून भाजी पाला विक्री करणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास जमावाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना बुधवारी संध्याकाळी शिरीष पाडा नाक्यावर घडली. तालुक्यातील शिरीष पाडा नाक्यावर संध्याकाळी रस्त्याच्या कडेला विविध खाद्यपदार्थ तसेच भाजीपाल्याची दुकाने थाटलेली असतात. काल नेहमीप्रमाणे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारी महिला शुभांगी गोतारणे ही नेहमीप्रमाणे आपले भाजी ... Read More »

महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावितांचा उमेदवार अर्ज दाखल

प्रतिनिधी/पालघर, दि. 4 : शिवसेना-भाजप-रिपाइं-श्रमजीवी महायुतीचे पालघर लोकसभेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आज, गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालघर शहरामध्ये महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांसह वाजत-गाजत शक्ती प्रदर्शन करण्यात आले. पालघर लोकसभा मतदार संघातील आठ तालुक्यातील शिवसेना भाजप व रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तर श्रमजीवी संघटनेनेही मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत गावित यांना पाठिंबा दर्शवला. रणरणत्या उन्हाची पर्वा ... Read More »

जव्हार आदिवासी प्रकल्पात घोटाळ्यांची मालिका उघड

विविध योजनांच्या माध्यमातून 10.5 लाखांचा अपहार राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 4 : जव्हार एकात्मिक आदिवासी प्रकल्पात सन 2014 व 2007-2008 दरम्यान राबविण्यात आलेल्या शासकिय योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असुन आदिवासी लाभार्थ्यांना इंग्लिश स्पिकिंग व संगणक प्रशिक्षण तसेच महिलांना शिवणयंत्र व घरघंटी वाटप अशा विविध योजनांद्वारे 10 लाख 50 हजार रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार जव्हार पोलीस स्टेशनमध्ये दाखल ... Read More »

अर्नाळ्यात जुगार धंदे व गावठी दारु अड्ड्यावर कारवाई

राजतंत्र न्यूज नेटवर्क/विरार, दि. 4 : येथील अर्नाळा पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार धंद्यांसह एका गावठी दारु अड्ड्यावर पोलीसांनी कारवाई करत हजारोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींविरोधात अर्नाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. अर्नाळ्यातील देवरुघकर नगर भागात इरफान मोहम्मद हुसेन शेख व कॉलीन चॉर्लस डिमेलो या दोघा इसमांच्या घरी मटका नावाचा जुगार खेळवला जात होता. पोलीसांनी ... Read More »

Scroll To Top