दिनांक 21 October 2019 वेळ 3:41 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 02

Daily Archives: 02/04/2019

जलद न्याय मिळवणे हा मुलभूत हक्क – न्या. अभय ठिपसे

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. २ : जलद न्याय मिळवणे हा मुलभूत हक्क असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते सोसायटी फाॅर फास्ट जस्टीस या संस्थेच्या ६ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. न्या. ठिपसे यांनी भारतीय संविधान व मूलभूत अधिकार याबाबत विवेचन केले. यावेळी संस्थेचे संस्थापक माजी अध्यक्ष संतोष शेट्टी, अध्यक्ष ... Read More »

वाड्यातील दगडखदाणी व क्रशर मशिन बंद करण्याचे तहसीलदारांचे आदेश

प्रतिनिधी/वाडा, दि.2 : तालुक्यातील पश्चिमघाट क्षेत्रात येणार्‍या भागात गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यात आल्याने येथील 11 दगडखदाणी व क्रशर मशिन बंद करण्याचे आदेश वाडा तहसीलदारांनी दिल्याने येथील दगडखदाणी व क्रशर मशिन मालकांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील काही भाग हा पश्चिमघाट क्षेत्रात येत असल्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या पर्यावरण व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेनुसार या क्षेत्रात गौणखनिज उत्खनन करण्यास ... Read More »

जव्हारमध्ये 72 हजारांचा गुटखा जप्त

राजतंत्र न्यूज नेटवर्क/जव्हार, दि. 2 : येथील एका इमारतीतील गोडाऊनमध्ये साठवून ठेवण्यात आलेला 72 हजार 200 रुपये किंमतीचा गुटखा पोलीसांनी छापा मारुन जप्त केला आहे. जव्हार पोलीसांच्या एका पथकाने ही कारवाई केली. जव्हार बस आगाराजवळील यसुफ आशियाना कॉम्पलेक्स या इमारतीतीत तळमल्यावर असलेल्या एका गोडाऊनमध्ये हजारो रुपये किंमतीच्या गुटख्याची साठवणूक करुन ठेवण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार काल, सोमवारी पोलीसांनी ... Read More »

विनापरवाना काळा गुळ व नवसागराची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 2 : गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा काळा गुळ व नवसागराची विनापरवाना वाहतूक करणारा एक टेम्पो पोलीसांनी जप्त केला असुन त्यात 28 हजार रुपयांचा काळा गुळ व 320 रुपये किंमतीचा नवसागर आढळून आला आहे. तसेच टेम्पोचालकाच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे एका गाळ्यावर छापा मारुन पोलीसांनी आणखी 28 हजार रुपयांचा काळा गुळ असा एकुण ... Read More »

वाडा : नुकसान भरपाईपासुन वंचित शेतकर्‍याकडून आर्थिक साहाय्याची मागणी

प्रतिनिधी : कुडूस, दि. 2 : गेल्या पावसाळी हंगामात पावसाने ओढ दिल्याने हातीतोंडी आलेले उभे पिक करपून गेल्याने वाडा तालुक्यातील बिलोशी गावचे शेतकरी बबन झिपरू काठोले यांची मोठी परवड झाली आहे. पिक हाती न लागल्याने कुटुंबाची स्थिती हलाखीची होऊनही पिक विम्याची रक्कम अथवा सरकारी कर्ज माफी न मिळाल्याने हवालदिल झालेल्या या शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांकडे आर्थिक साहाय्याची याचना केली आहे. बबन काठोले ... Read More »

Scroll To Top