दिनांक 21 October 2019 वेळ 2:50 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April » 01

Daily Archives: 01/04/2019

वाड्यातील तिळसेश्वर मंदिरात चोरी

वाड्यात भुरट्या चोरांनी हौदोस घातला असून काही दिवसांपूर्वी खंडेश्वरी नाका येथील एका कपड्याच्या दुकानात चोरी झाली होती. आता तालुक्यातील तिळसा येथील शिव मंदिरातील पितळेची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. Read More »

विरारमध्ये गावठी हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त

* 31 हजारांचा मुद्देमाल केला नष्ट राजतंत्र न्युज नेटवर्क/विरार, दि. 1 : येथील तिल्हेर गावच्या हद्दीतील जंगलात अवैधरित्या गावठी हातभट्टी लावुन दारु तयार करणार्‍या अड्ड्यावर काल, रविवारी पोलीसांनी कारवाई करत तयार दारुसह ही दारु बनविण्यासाठी लागणारा 31 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मांडवी पोलीस दुरक्षेत्रातील तिल्हेर गावच्या हद्दीतील डोंगराळ जंगल भागात जानु गंगाराम गहला (वय ... Read More »

दीड एकर क्षेत्रात भारताचा मानवी नकाशा साकारून मतदार जनजागृती

प्रतिनिधी/जव्हार दि. 1 : येत्या 29 एप्रिल रोजी पालघर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत असुन जिल्हा प्रशासनातर्फे विविध माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जव्हार येथील भारती विद्यापीठ क्रीडांगणाच्या तब्बल दीड एकर क्षेत्रात मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा साकारण्यात आला होता. तसेच निवडणूक चिन्ह, दिव्यांग चिन्ह व आय व्हील व्होट अशा आशयाची भव्यदिव्य रांगोळी काढून मतदार जनजागृती ... Read More »

दारुच्या नशेत आश्रमशाळा विद्यार्थ्यांना मारहाण, मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 1 : तालुक्यातील सुर्यमाळ शासकिय आश्रमशाळेतील आदिवासी मुलांना येथील मुख्याध्यापक रमेश नंदन यांनी सलग दोन दिवस दारूच्या नशेत मारहाण करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापक नंदन यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत असतानाच आता दस्तूरखुद्द राज्य मानवाधिकार आयोगानेच याप्रकरणी लक्ष घातले असून येत्या 3 एप्रिल रोजी सुनावणी मुक्रर केली ... Read More »

लक्झरी बसमधुन गुटख्याची तस्करी!

* महामार्गावर 4.74 लाखांचा गुटखा पकडला राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 1 : मागील काही महिन्यांपासुन ट्रक व टेम्पोंमधुन अवैधरित्या होणार्‍या गुटख्याच्या तस्करीवर पालघर पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. यातून पोलीसांनी कोट्यावधी रुपयांचा गुटखा आतापर्यंत जप्त केला आहे. पोलिसांकडून ट्रक व टेम्पोंवर होणारी कारवाई पाहता धाबे दणाणलेल्या तस्करांनी आता शक्कल लढवत लक्झरी बसमधुन गुटख्याची तस्करी सुरु केल्याचे दिसत असुन मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ... Read More »

Scroll To Top