दिनांक 21 January 2020 वेळ 6:12 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » April

Monthly Archives: April 2019

कासा : रस्त्याच्या दुभाजकावर आढळले स्त्री जातीचे अर्भक

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 30 : तालुक्यातील कासा येथील रस्त्याच्या दुभाजकावर अंदाजे 2 महिने वयाचे स्त्री जातीचे जिवंत अर्भक आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कासा पोलिसांनी अज्ञात मातापित्याविरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 317 नुसार गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास करण्यात येत आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कासा येथे राहणार्‍या एका 19 वर्षीय महिलेला काल, 29 एप्रिल ... Read More »

पालघर : 12 लाखाहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क!

63.72 टक्के मतदानाची नोंद राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 30 : काल, 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात पार पडलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत 63.72 टक्के मतदान झाले असुन एकुण 18 लाख 85 हजार 297 मतदारांपैकी 12 लाख 1 हजार 298 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार आपले नशिब आजमावत असुन 23 मे रोजी होणार्‍या मतमोजणीनंतर मतदारांनी नक्की कुणाच्या ... Read More »

माणिकपुर पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे लाखोंचे सोने असलेली बॅग मिळाली

राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 30 : निवडणुक बंदोबस्तात व्यस्त असतानाही माणिकपुर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत प्रवासादरम्यान एका रिक्षात विसरलेली बॅग संबंधित महिलेला परत मिळवून दिल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतूक होत आहे. या बॅगेत 5 लाख 10 हजार रुपये किंमतीचे दागिने होते अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिल रोजी सकाळी सौ. जोत्स्ना अँग्नेल बेंड्याचा (वय 41) ही महिला वसई रोड रेल्वे ... Read More »

अखेर दोन महिन्यानंतर नाणे येथील ट्रान्सफार्मर कार्यान्वित

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : ऐन उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना तालुक्यातील नाणे येथील अवचित पाडा येथील वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफार्मर मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले होते. अखेर गेल्या रविवारी (दि. 28) सदर ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यात आला असुन वीजपुरवठा सुरु झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे. वाडा पंचायत समितीचे सदस्य अरुण अधिकारी ... Read More »

निवडणुकीच्या पुर्वसंध्येला शिवसेना-बविआमध्ये राडा!

दोन्ही पक्षांच्या 80 ते 90 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 30 : शिवसेनेचे आमदार व पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांनी मतदानाच्या आदल्या रात्री आपला मतदारसंघ नसतानाही नालासोपार्‍यात हजेरी लावल्यामुळे शिवसेना व बहूजन विकास आघाडीच्या (बविआ) कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या पुर्वसंध्येलाच जोरदार राडा झाला. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही पक्षांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरुन आमदार रवींद्र फाटक तसेच बविआचे महापौर व माजी उप ... Read More »

आमदार रवींद्र फाटक यांच्यविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 29 : प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मतदार संघाबाहेरून आलेले व त्या मतदारसंघाचे मतदार नसलेल्या नेत्यांनी त्या मतदारसंघात उपस्थित राहू नये, असे निवडणुक आयोगाचे निर्देश असताना नालासोपारा येथे आलेले शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यरात्री एक वाजता आमदार रवींद्र फाटक महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे निवडणूक प्रतिनिधी असलेले जितेंद्र शिंदे यांच्या ... Read More »

वावेघर येथे धाडसी चोरी, 10 तोळे सोने लंपास

प्रतिनिधी/वाडा, दि. 29 : वावेघर येथील एका घरातील सदस्य देवदर्शनाला गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सदर घराचा मागचा दरवाजा तोडून घरातील लाखो रुपये किंमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील वावेघर येथील प्रकाश ठाकरे यांच्या घरातील सदस्य शुक्रवारी (दि. 26) डहाणू येथील महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले असताना संध्याकाळच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील दरवाज्याची कडी तोडून आत प्रवेश ... Read More »

मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज! -जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 26 : पालघर लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार असून निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. नारनवरे यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. मतदानाच्या दिवसापर्यंत पोलीस आणि विविध पथकांना अतिशय काटेकोरपणे ... Read More »

महायुतीच्या प्रचार सभेत हजेरी लावणार्‍या तडीपार गुंडाविरोधात गुन्हा दाखल

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 26 : पालघर लोकसभेतील महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेत तडीपार केलेल्या गुंडाने हजेरी लावल्याचा प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे या सभेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची विशेष उपस्थिती असताना सभेत तडीपार गुंड उपस्थित राहिल्यामुळे खळबळ उडाली होती. संजय बिहारी ऊर्फ संजय राजेंद्र महंतो असे सदर गुंडाचे नाव असुन तुळींज पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल ... Read More »

मतदानासाठी सुट्टी न मिळाल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहन

मतदानाच्या दिवशी ज्यादा गाड्या राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 25 : पालघर लोकसभा मतदार संघासाठी येत्या सोमवारी (दि. 29 एप्रिल) मतदान होणार आहे. या मतदार संघातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी 29 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असुन या आदेशानुसार मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास संबंधितांविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा पालघर कामगार उप आयुक्तांनी ... Read More »

Scroll To Top