दिनांक 21 May 2019 वेळ 12:20 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » March » 15

Daily Archives: 15/03/2019

जबरी चोरी करणार्‍या टोळीला तासाभरात केले गजाआड

नालासोपारा पोलीसांची कामगिरी राजतंत्र न्यूज नेटवर्क/नालासोपारा, दि. 15 : दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन रस्ता ओलांडणार्‍या महिलेची बॅग घेऊन लंपास झालेल्या 2 चोरट्यांसह त्यांच्या इतर दोन साथिदारांना तासाभरात अटक करण्यात नालासोपारा पोलीसांना यश आले असुन या टोळीकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. 13 मार्च रोजी नालासोपारा पुर्वेला राहणारी सौ. हेमा यजवेंद्र सिंग ही महिला रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात ... Read More »

ग्रामीण रुग्णालयाने घेतला मोकळा श्वास

अनधिकृत पार्किंगला बसला आळा प्रतिनिधी/वाडा, दि. 15 : वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात अनेक वर्षांपासून अनधिकृत पार्किंग केली जात होती. या अनधिकृत पार्किंगमुळे अनेकवेळा रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात जाण्यासाठी अडचण होत होती. अखेर ग्रामीण रुग्णालय प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर कायमचा तोडगा काढत अनधिकृत पार्किंग होत असलेल्या जागेत लोखंडी अँगल लावून अनधिकृत पार्किंगला कायमस्वरूपी बंदी आणली आहे. भिवंडी, ठाणे, ... Read More »

दारुची चोरटी वाहतूक करणार्‍या कारला अपघात

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 15 : बेकायदेशिररित्या दमण बनावटीची दारु महाराष्ट्रात विक्रीसाठी घेऊन येणार्‍या एका चारचाकी कारला मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीतील महालक्ष्मी उड्डाणपुलावर अपघात झाल्याची घटना बुधवारी (दि. 13) संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान घडली. यात कोणतीही जिवितहानी झाली नसुन कारवाईच्या भितीने कारचा चालक व त्याचा साथिदार कार घटनास्थळी सोडूनच फरार झाला आहे. याप्रकरणी कासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ... Read More »

वसई : अवैध रेती वाहतूक, 30 लाखांच्या रेतीसह 2 कंटेनर जप्त

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 15 : वसई पोलीसांकडून मागील अनेक महिन्यांपासुन रेती माफियांवर तसेच अवैधरित्या होत असलेल्या रेतीवाहतूकीवर कारवाई करण्यात येत असुन काल, गुरुवारी मध्यरात्री चोरट्या पद्धतीने रेतीची वाहतूक करणार्‍या 2 कंटेनरवर पोलीसांनी कारवाई करत कंटेनरसह 30 लाख 84 हजार रुपयांची रेती जप्त केली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम.एच. 04/एच. डी. 9916 व एम.एच.46/एच. 1655 (दोन्ही बंद बॉडीचे कंटेनर) ... Read More »

वसईत दोन तरुणांकडून एक पिस्तुल व काडतुसे जप्त!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/वसई, दि. 15 : तालुक्यातील चिंचोटी-भिवंडी रस्त्यावर असलेल्या हॉटेल फ्लोराच्या परिसरात विनापरवाना पिस्तुल बाळगणार्‍या दोन तरुणांना पोलीसांनी अटक करत त्यांच्याकडून 1 पिस्तुल व 4 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन काल, गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सैफ अस्लम खान (वय 24) व लक्ष्मण दिलीप सुर्वे (वय 19, दोघे राहणार नालासोपारा पुर्व) ... Read More »

स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण कार्यशाळेत संवाद टुल किटचे वाटप!

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 15 : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता राखणार्‍या स्वच्छाग्रहींसाठी नुकतेच दोन दिवसीय अनिवासी तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालघर पंचायत समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेत स्वच्छाग्रहींना संवाद टुल किटचे वाटप करण्यात आले. गावात शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या महसुल गावनिहाय स्वच्छताग्रहींची निवड करण्यात आली आहे. गावपातळीवर वैयक्तिक, सार्वजनिक व संस्थात्मक स्वच्छता ... Read More »

Scroll To Top