दिनांक 15 October 2019 वेळ 6:32 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » March » 08

Daily Archives: 08/03/2019

बोईसर येथे 2 कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ!

वार्ताहर/बोईसर, दि. 8 : पालघर तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीच्या 2 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा आज मान्यवरांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यामाध्यमातून ओत्सवाल एम्पायर भागात आरओ प्लांट बसविण्यात आला असुन केवळ एक रुपयात बोईसरकारांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. तसेच ही सुविधा कायमस्वरूपी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच वैशाली बाबर व उपसरपंच राजेश करवीर यांनी यावेळी ... Read More »

वाड्यात दगडाने ठेचून तरुणाचा खून

प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : तालुक्यातील अबीटघर गावाच्या हद्दीत असलेल्या जगदंब स्टील कंपनीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत एका 22 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला असुन दगडाने ठेचून या तरुणाची निर्घुण हत्या केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी 3 संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांची कसुन चौकशी सुरु आहे. अबीटघर येथील पोलीस पाटील सीमा पाटील यांनी गुरुवारी वाडा पोलिसांना सदर अनोळखी मृतदेहाबाबत खबर ... Read More »

पालघर नगरपरिषद निवडणूक : छाननीमध्ये 11 उमेदवारी अर्ज बाद

शिवसेना-भाजप युतीचे 2 उमेदवार बिनविरोध वार्ताहर/बोईसर, दि. 8 : पालघर नगरपरिषदेच्या 28 नगरसेवक पदांसाठी दाखल झालेल्या 148 उमेदवारी अर्जांपैकी 11 उमेदवारी अर्ज आज झालेल्या छाननीमध्ये बाद झाले असुन यामुळे शिवसेना-भाजप युतीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. पालघर नगरपरिषदेसाठी येत्या 24 मार्च रोजी निवडणूक होत आहे. नगर परिषदेतील 14 प्रभागातील 28 जागांसाठी काल, गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत 148 ... Read More »

चिल्हार येथे स्फोटकांनी भरलेल्या दोन वाहनांवर कारवाई!

मोठ्या प्रमाणावर जिलेटीन कांड्यांचा साठा जप्त वार्ताहर/बोईसर, दि. 8 : गुजरात राज्यातून बेकायदेशीररित्या स्फोटकांचा साठा घेऊन मनोरमधील नागझरी येथे निघालेल्या दोन वाहनांवर पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटने कारवाई करत दोन्ही वाहनांसह मोठ्या प्रमाणावर जिलेटीन स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. गेल्या चार महिन्यांपासुन अशाप्रकारे चोरट्या पद्धतीने दगड खाणींसाठी स्फोटकांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे. बोईसर पुर्वेकडील ... Read More »

जव्हारमधील विविध ठिकाणी महिला दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी/जव्हार, दि. 8 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मार्फत तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामसंघ स्थापन करण्यात आले असून आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने खडखड येथील सिंधूताई सपकाळ महिला ग्रामसंघामार्फत धापरपाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या जव्हार शाखेचे व्यवस्थापक अभिजित कुलथे यांनी बँक ... Read More »

Scroll To Top