दिनांक 21 October 2019 वेळ 2:55 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » March » 03

Daily Archives: 03/03/2019

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून चोरटा फरार

प्रतिनिधी/वाडा, दि. 3 : वाड्यातील रहदारीच्या व गजबजलेल्या पाली नाका येथे मिनिडोअर रिक्षामध्ये बसलेल्या महिलेच्या गळ्यातून 53 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण खेचून चोरटा फरार झाल्याची घटना घडली आहे. गुरुवारी 28 फेब्रुवारी रोजी सदर महिला विक्रमगडला जाण्यासाठी खंडेश्वरीनाका येथे मिनिडोअर रिक्षामध्ये बसली असता त्या ठिकाणी एक इसम चालत आला व अचानक तिच्या गळ्यातील 36 ग्राम वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून अंधाराचा ... Read More »

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 12 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल

>> पीडिता गर्भवती >> मोखाड्यातील घटना प्रतिनिधी/मोखाडा, दि. 3 : दांडवळ येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणार्‍या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने सतत चार महिने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असुन यातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलाविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडवळ ... Read More »

पोलीस अधिक्षकांच्या पथकातील दोन अधिकार्‍यांवर खंडणीचा गुन्हा!

पालघर जिल्हा पोलीस खात्यातील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर वार्ताहर/बोईसर, दि. 3 : एका गुन्ह्यातील आरोपीला अटक टाळण्यासाठी तीन लाखांची मागणी करणार्‍या बोईसर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस उप निरिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ अटक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पालघर पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकातील दोन पोलीस अधिकार्‍यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्हा पोलीस खात्यातील भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघर ... Read More »

विज्ञान बोध वाहिनीचा शुभारंभ!

पंचायत समिती व सर फाउंडेशनचा उपक्रम राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ३ : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, पर्यावरणीय घडामोडींची कारणीमीमांसा करता यावी व विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती विकसीत व्हावी यासाठी विविध वैज्ञानिक डहाणू तालुका पंचायत समिती व सर फाऊंडेशन (पालघर) यांच्यातर्फे डॉ .ए. पी. जे अब्दुल कलाम विज्ञान बोध वाहिनी अभियान सुरु करण्यात ... Read More »

दुचाकी अपघातात वाड्यातील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील सापने गावाच्या हद्दीत भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकाला धडकल्याने 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सुरज तुकाराम बोबे असे सदर तरुणाचे नाव असुन सुरज शुक्रवारी (दि.1) आपल्या दुचाकीवरुन त्याच्या भावोजीला विक्रमगड तालुक्यातील टेटवाली येथे सोडायला गेला होता. त्यांना सोडून तो रात्री उशिरा वाड्यातील जामघर येथील आपल्या घरी परतत असताना सापने गावाच्या ... Read More »

कुडूस येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

प्रतिनिधी/कुडूस, दि. 3 : वाडा तालुक्यातील कुडूस येथील साहित्य कला विचार मंच व शिवतेज मित्र मंडळ जयश्री नगर यांच्या विद्यमाने मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय जोगमार्गे यांच्यामार्फत येत्या 10 मार्च रोजी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्यकार प्रा. आचार्य विजयाताई मारोतकर (नागपूर) या भुषविणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ... Read More »

स्फोटकाच्या साहाय्याने मासेमारी, जिलेटीन स्फोटात तरुण ठार

वार्ताहर/बोईसर, दि. 03 : पालघर तालुक्यातील नागझरी गावच्या हद्दीतील सूर्या नदीत शुक्रवारी सायंकाळी स्फोटकांच्या साहाय्याने मासेमारी करताना एका तरुणाचा मृत्यू झाला. गणेश बाळू वणगा (वय 23) असे सदर तरुणाचे नाव असून नागझरीच्या तांबडी पाड्याचा तो रहिवासी होता. सूर्या नदी पात्रात शुक्रवारी 4 वाजताच्या सुमारास स्फोटकांच्या साहाय्याने मासेमारी करीत असताना स्फोटक हातातच फुटल्याने गणेश गंभीर जखमी झाला होता. या भयंकर स्फोटात ... Read More »

Scroll To Top