दिनांक 21 May 2019 वेळ 1:00 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 20

Daily Archives: 20/02/2019

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारच्या धडकेत बिबट्या ठार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 20 : कारने धडक दिल्यामुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबई – अहमदाबाद महामार्गावर घडली असुन बिबट्याच्या धडकेनंतर नियंत्रण सुटलेल्या कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत. महामार्गावरील धानिवरी हद्दीतील आंबोली येथे हा अपघात घडला. अंदाजे चार वर्षांचा मादी बिबट्या अहमदाबाद – महामार्ग ओलांडत असताना मुंबईच्या दिशेने जाणार्‍या स्विफ्ट डिझायर कारने त्याला धडक दिली. ही धडक इतकी ... Read More »

जिल्ह्यातील शाळा व क्रीडा संस्थांना धनुर्विद्या क्रीडा साहित्यांचे वाटप

वार्ताहर/बोईसर, दि. 20 : पालघर डिस्ट्रिक्ट आर्चरी असोशिएशनमार्फत पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांना व क्रीडा संस्थांना आज धनुर्विद्या खेळाच्या साहित्यांचे वाटप करण्यात आले. चिंचणी – तारापूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रजनीकांतभाई श्रॉफ, संस्थेचे सदस्य महेश पाटील व असोशिएशनचे खजिनदार संतोष पिंगुळकर यांच्या हस्ते सदर साहित्यांचे वाटप करण्यात आले. चिंचणीतील के. डी. हायस्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. पालघर जिल्ह्यात धनुर्विद्या खेळाचा प्रचार ... Read More »

नाणे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी/वाडा, दि. 20 : तालुक्यातील नाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कृष्णांग सेवाभावी क्रांती संस्थेचे सेवक नितीन वासुदेव पाटील व सहकारी क्रांतीदुत यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवरायांचे विचार मनात रुजावेत यासाठी गावातील तरुण वर्गाने उर्त्स्फूतपणे या शिवजयंती कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी गावातून मोटार सायकलींवरुन मशाल घेऊन मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिव मूर्तीचे पुजन करून मान्यवरांचे स्वागत ... Read More »

डहाणूत शिवजयंती निमित्त मिरवणूक, रक्तदान व व्याख्यान

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. २०: काल डहाणूतील सकल शिवप्रेमी मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी नुकत्याच आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचवेळी रक्तदान शिबीर, भव्य मिरवणूक व छत्रपतींच्या जीवनावर व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजीत रक्तदान शिबिरात ७७ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मिर ... Read More »

कोमसाप पुरस्कार : डॉ. अनंत देशमुख कोकण साहित्य भूषण, तर डॉ. महेश केळुसकरांना कविता राजधानी पुरस्कार

राजतंत्र न्यूज नेटवर्क/मुंबई, दि. 20 : कोकण मराठी साहित्य परिषदेचे 2018-19 चे वाङ्मयीन व वाङ्मयेतर पुरस्कार आज मुंबईत पुरस्कार समितीचे निमंत्रक प्रा. अशोक ठाकूर यांनी जाहीर केले. ज्येष्ठ समीक्षक व चरित्रकार डॉ. अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कोकण साहित्य भूषण या सन्मानाने गौरविण्यात येणार असून निद्रानाश या नव्या कवितासंग्रहासाठी महेश केळुसकर यांना कविता राजधानी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ... Read More »

आज डहाणूला भूकंपाचे 3 धक्के

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. २०: आज सकाळपासून डहाणूला भूकंपाचे 3 धक्के जाणवले. पहिला धक्का सकाळी 10.14 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, दुसरा धक्का दुपारी 1.24 वाजता 2.9 रिश्टर स्केलचा, तर तिसरा धक्का दुपारी 1.29 वाजता 3.1 रिश्टर स्केलचा होता. या तीनही भूकंपांचे केंद्रबिंदू भूपृष्ठापासून 10 किलोमीटर खोल असून यातील पहिला व तिसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 20° तर रेखांश 72.8° वर आणि ... Read More »

वाडा तालुका शिक्षक सेनेची आशेरी गडावर शिवजयंती

> गड स्वच्छता मोहिम राबवून दुर्ग संवर्धन मोहिमेला लावला हातभार प्रतिनिधी/कुडूस, दि. 20 : वाडा तालुका शिक्षक सेनेने यावर्षी पालघर तालुक्यातील आशेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी केली. यावेळी शिक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी गड स्वच्छता मोहिम राबवून दुर्ग संवर्धन मोहिमेला हातभार लावला. वाडा तालुका शिक्षक सेनेच्या वतीने प्रतिवर्षी शिवजयंतीला वेगवेगळ्या किल्ल्यांवर दुर्ग भ्रमण व दुर्ग स्वच्छता मोहिम राबवून शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली जाते. ... Read More »

Scroll To Top