दिनांक 21 May 2019 वेळ 1:05 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February » 14

Daily Archives: 14/02/2019

गुटखा विक्री करणार्‍या तरुणाला कारावास व 1 लाखांचा दंड

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू, दि. 14 : आपल्या चारचाकी वाहनातून बेकायदेशिररित्या गुटख्याची वाहतुक करताना आढळून आलेल्या 24 वर्षीय तरुणाला न्यायालयाने 112 दिवस कारावास व 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. अब्दुल कादीर खान असे सदर तरुणाचे नाव असुन 11 डिसेंबर 2015 रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी गावच्या हद्दीत त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले होते. अब्दुल खान विविध ठिकाणी गुटख्याचे चोरट्या पद्धतीने वितरण करत होता. ... Read More »

महावितरणच्या कर्मचार्‍यांना मारहाण, आरोपींना 2 वर्षांची शिक्षा

राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 14 : वीज चोरी केल्याप्रकरणी कारवाई करणार्‍या महावितरणच्या कर्मचार्‍यांसह कनिष्ठ अभियंत्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करणार्‍या तारापूर-पोफरण येथील 3 जणांना न्यायालयाने 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर 2011 रोजी महावितरणचे कर्मचारी कनिष्ठ अभियंत्यासह पोफरण गावाच्या हद्दीत विद्युत संचाची तपासणी करीत असताना जयेश काशीनाथ नाईक (वय 38) व माया जगदीश मर्दे (वय ... Read More »

तलासरीमध्ये रेतीची माती खाताना, मंडळ अधिकारी ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

राजतंत्र न्यूज नेटवर्क/तलासरी, दि. १४: अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच मागणारा तलासरीचा मंडळ अधिकारी सुनील पोपट राठोड (४५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. राठोडने ट्रकवर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे 35 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्राप्त होताच खातरजमा करुन सापळा रचला असता राठोडच्या सांगण्यावरून मध्यस्त माधव गुलाबसिंग ... Read More »

वसईत 2500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त!

> गुन्हे प्रतिबंधक पथकाची कारवाई राजतंत्र न्युज नेटवर्क/वसई, दि. 14 : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात 2500 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले असुन हे पनीर तयार करणार्‍या 2 डेअरींवर बंदीची कारवाई करण्यात येत आहे. वसई गुन्हे प्रतिबंधक पथक व अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्यास घातक भेसळयुक्त पनीर व बटर बनवले जात असुन त्याची परिसरातील ... Read More »

Scroll To Top