दिनांक 23 April 2019 वेळ 6:25 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » February

Monthly Archives: February 2019

पसंतीच्या वाहन नोंदणी चिन्हासाठी 2 मार्च 2019 पर्यंत अर्ज करावेत

राजतंत्र, न्युज नेटवर्क पालघर दि. 27 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वसई मु.पो. चंदनसार – भाटपाडा, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर पिन. 401303 येथे परिवहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी सध्या BL ही मालिका सुरु आहे. सदर मालिका दोन दिवसात संपुष्टात येत असल्याने परिवहन संवर्गातील वाहन नोंदणीसाठी BN ही मालिका सुरु करण्यात येणार आहे. सदर नवीन मालिकेतील आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी ... Read More »

फ्लॅटला आग लागून गॅस सिलेंडरचा स्फोट घर जळून खाक; जिवीतहानी नाही

राजतंत्र, प्रतिनिधी पालघर, दि. २७: पालघर शहरातील माहीम मार्गालगत असलेल्या दिक्षित अपार्टमेंट या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कल्पेश पाटील यांच्या सदनिकेला आग लागून संपूर्ण घर भस्मसात झाले. आग लागली त्यावेळी घरामध्ये कल्पेश पाटील यांची आई, मुलगा व पाळीव कुत्रा होते. मात्र ते सुरक्षितरित्या बाहेर पडले व इमारती मधील अन्य रहिवाशांना देखील सावध केले. त्यामुळे जिवीत हानी टळली आहे. आग लागलेली असतानाच ... Read More »

लोकसहभागातून पालघर येथे येत्या 3 मार्च रोजी महाआरोग्य शिबीर, आरोग्य तपासणी करा, पालकमंत्री विष्णू सवरा यांचे आवाहन

राजतंत्र, प्रतिनिधी पालघर, दि. 27- पालघर येथे येत्या तीन मार्च रोजी आयोजित केले जाणार असलेल्या महाआरोग्य शिबिरात जिल्ह्यातील विशेषत: आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टर्समार्फत मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध होणार आहेत. या शिबिरासाठी जिल्ह्यातील सर्व घटकांचा लाभत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता शासकीय निधीचा वापर न करता लोकसहभागातूनच हे शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी बांधवांचे हित लक्षात ... Read More »

लाच घेणारे २ पोलीस उप निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

राजतंत्र, प्रतिनिधी बोईसर, दि. २७: एका गुन्ह्यातील आरोपीला अटक करु नये यासाठी ३ लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या बोईसर पोलीस स्टेशनच्या नेमणूकीतील २ पोलीस उप निरिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. प्रशांत बाळासाहेब पासलकर (32) व नजीब नजीर इनामदार (38) अशी या लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. या पोलीसांनी फिर्यादीकडून अटक टाळण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत ... Read More »

पॉलिश करण्याच्या बहाण्याने दागिने लंपास करणारा आरोपी अटकेत

प्रतिनिधी/वाडा, दि. 26 : भांडी व सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन महिलांना गुंगारा देऊन त्यांच्याकडील दहा तोळे सोने घेऊन फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात अखेर वाडा पोलिसांना यश आले असून विनोदप्रसाद मुकेशप्रसाद शहा असे अटक आरोपीचे नाव आहे. तर त्याचे इतर 3 साथीदार अद्याप फरार आहेत. 8 जानेवारी 2019 रोजी दुपारच्या सुमारास वाड्यातील राम मंदिराजवळ राहणार्‍या वैभव गंधे यांच्या ... Read More »

अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या वादात शिबीर रद्द; अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या झाल्या रोषाचे धनी

दीपक गायकवाड/मोखाडा : अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या वादात काल, 25 फेबु्रवारी रोजी खोडाळ्यात नियोजित असलेला महिला मेळावा व आरोग्य शिबीर रद्द झाले. मात्र, या शिबीरासाठी महिला व बालकांना शिबिरस्थळी आणण्याची जबाबदारी असणार्‍या अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती अडचणीत आल्या आहेत. त्यांना गरोदर, स्तनदा मातांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. तर या पुढे होणार्‍या शिबिरांसाठी माता, बालके आणि किशोरवयीन मुलींपुढे कोणत्या तोंडाने ... Read More »

विक्रमगड : कार अपघातात दोन ठार, तीन जखमी

मृतांमध्ये 8 महिन्याच्या चिमुकलीचा समावेश प्रतिनिधी/वाडा, दि.26 : वाडा-विक्रमगड रस्त्यावरील सजन येथे गाडीवरील नियंत्रण सूटल्याने झालेल्या अपघातात शिळ येथील तरुण कल्पेश सांबरे (वय 30) व त्याची 8 महिन्याची मुलगी ओवी सांबरे हिचा जागीच मृत्य झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली असुन आई आणि एका मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे. आज, सकाळी कल्पेश सांबरे हा तरुण झडपोली येथून आपल्या एम.एच.02/बी.जी. ... Read More »

वैधता संपलेल्या गोळ्या दिल्या, वाड्यातील खाजगी डॉक्टरचा प्रताप

प्रतिनिधी/वाडा, दि. 25 : तालुक्यातील डॉ. सुभाष लाला यांच्याकडे उपचारासाठी गेलेल्या एका रुग्णाला त्यांनी चक्क वैधता संपलेल्या गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून रुग्णाच्या जिवाशी खेळ करणार्‍या या कृत्याची चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. वाड्यातील मस्जिदनाका येथे डॉ. सुभाष लाला यांचे खाजगी क्लिनिक असून त्यांची वाड्यातील प्रसिद्ध व अनुभवी डॉक्टर अशी ओळख आहे. सोमवारी सकाळी ... Read More »

जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा खासदार गावीत यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद

वार्ताहर/बोईसर, दि. 25 : भगतसिंग कोशियारी समितीचा अहवाल पूर्णतः लागू करा व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, आदी प्रमुख मागण्यांसाठी आज ईपीएस-95 पेन्शनधारकांनी खासदार राजेंद्र गावीत यांच्या पालघर येथील निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन करुन आक्रोश व्यक्त केला. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी वगळता देशभरातील कामगारांसाठी केंद्र सरकारने 1995 साली पेन्शन योजना सुरु केली. या योजनेचा दर दोन वर्षांनी आढावा घ्यायचा असे ... Read More »

अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या सुंदोपसुंदीत गरोदर आदिवासी महिलांची हेळसांड

कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येलाच नियोजित शिबीर केली रद्द! दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 25 : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत खोडाळा येथे आज, सोमवारी (दि. 25) महिला मेळावा व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमांच्या आयोजनात ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात न घेतल्याने यावर फनाफराजीनामा नाट्य घडल्याने ऐन कार्यक्रमाच्या पुर्वसंध्येलाच नियोजित शिबीर रद्द करण्याची नामूष्की आरोग्य प्रशासनाला पत्करावी लागली. परिणामी अधिकारी ... Read More »

Scroll To Top