दिनांक 21 October 2019 वेळ 3:10 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 23

Daily Archives: 23/01/2019

इंटर डिस्ट्रिक्ट सब ज्युनियर वुमन्स फुटबॉल चँपियन स्पर्धेत मुंबईच्या संघाने बाजी मारली; नागपुरच्या मुलीं उपविजेत्या

पालघर जिल्हा फुटबॉल असोसिएशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने बोईसर येथे पार पडलेल्या स्पर्धेत मुलींच्या मुंबई जिल्हा ज्युनियर संघाने बाजी मारली. तर नागपुर जिल्हा ज्युनियर मुलींचा संघ उपविजेता ठरला आहे. स्पर्धेमध्ये 24 जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिंदाल कंपनीचे महाव्यस्थापक जे. बी. लाड, आरती ड्रग्जचे ऊदय पाटील, पालघर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे ... Read More »

हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणार्‍या ट्रकला अपघात ट्रक जळून खाक, चालक जागीच ठार

डहाणू दि. 22: गुजरात मुंबई महामार्गावर चारोटी येथील पुलावर हायड्रोजन गॅसचे सिलेंडर वाहतुक करणार्‍या ट्रकला अपघात झाला असून अपघातात लागलेल्या आगीमुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जागीच जळून मृत्यूमुखी पडला आहे. भरोडा ते तळोजा येथील श्री जी कार्बोनिक कंपनीचा हा हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास कासा पोलीस ... Read More »

घोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार

वाडा, दि. 22: तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी, नियमबाह्य व भ्रष्ट कारभार सुरु असल्याचा आरोप करीत या कारभाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य विकास घरत यांनी पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे एका तक्रारी द्वारे केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरु असून या कारभारामुळे ग्रामपंचायतीने शासकीय नियम धाब्यावर बसवले आहेत. या ग्रामपंचायतीत ग्रामनिधीतून विकास कामे ... Read More »

प्राणिशास्त्राकडे सकारात्मकतेने पहावे- डॉ. संजय भागवत

पालघर,दि. 22 : विद्यार्थ्यांनी प्राणिशास्त्र विषयाकडे सकारात्मकतेने पहाण्याची गरज असून मधुमक्षीका पालन, दुग्धप्रकल्प, शेळीपालन, कोळंबी प्रकल्प, शोभिवंत माशांचे प्रजनन व विक्री, जैवमाहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन, पर्यावरणीय अहवाल बनविणे अशा विविधी क्षेत्रात रोजगार व उद्योगाच्या संधी आहेत, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन प्राणिशास्त्रज्ञ डॉ. संजय भागवत यांनी पालघर येथे बोलताना केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्राणिशास्त्रातील संशोधन आणि रोजगाराच्या संधी या ... Read More »

Scroll To Top