दिनांक 21 October 2019 वेळ 3:54 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 14

Daily Archives: 14/01/2019

कुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव

>> 7/12 उतारे, विविध दाखले व इतर कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने घातला घेराव  प्रतिनिधी/वाडा, दि. 14 : तालुक्यातील कुडूस तलाठी सजेच्या तलाठी सिमा सांबरे-पष्टे या शेतकर्‍यांना 7/12 उतारे, विविध प्रकारचे दाखले व इतर कागदपत्रे देण्यासाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारायला लावत असल्याचा आरोप करत या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आज दुपारी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. श्रमजीवीचे नेते मिलींद ... Read More »

सूर्या पाणीपुरवठा योजनेला विरोध : अटक शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ हालोली येथे आंदोलन

>> एमएमआरडीए विरोधात ग्रामस्थ, शेतकरी आक्रमक प्रतिनिधी/मनोर, दि. 14 : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजने विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना शनिवारी (दि. 12) पोलीसांनी अटक करुन त्यांच्याविरोधात मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याने एमएमआरडीए आणि पोलीस प्रशासनाने सूडबुद्धीने शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करीत हालोली, बोट, कुडे, सातीवली, ढेकाळे आणि दुर्वेस येथील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी आज आक्रमक होत एमएमआरडीए विरोधात महामार्गालगतच्या हालोली ... Read More »

सागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

वार्ताहर/बोईसर, दि. 14 : इतर भागातील मच्छीमारांचे पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रातील अतिक्रमण रोखावे या मुख्य मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी दमण ते दातीवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दहा हजाराच्यावर मच्छीमार बांधव या मार्चात सहभागी झाले होते. पारंपरीक मासेमारी व्यवसायाप्रमाणे प्रत्येक मच्छीमाराने आपल्या सागरी हद्दीतील 12 नॉटिकल अंतरापर्यंत कव पद्धतीने मासेमारी करायची असा नियम ... Read More »

अहिंसेच्या मार्गा शिवाय पर्याय नाही! -मुक्ता दाभोळकर

प्रतिनिधी वाडा, दि. 13 : कितीही संताप आला तरी तो संविधानाच्या मार्गानेच व्यक्त व्हायला हवा, असे सांगतानाच अहिंसेच्या मार्गा शिवाय पर्याय नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी वाडा येथे आयोजित डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी. वाय. एफ. आय.) च्या 11 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. येथील पटारे हॉल येथील सभागृहात 11 ते 13 ... Read More »

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अत्याचार पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण उजेडात, दोन आरोपींवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी मनोर, दि. 13 : मनोर नजीकच्या बोट गावातील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन शारीरिक संबंध ठेवल्याने पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असुन मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनोर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावरील बोट गावातील पिडीत मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्याच गावातील महिलेने आपल्या ड्राइवर मित्रासोबत पिडीत मुलीस शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडले. ... Read More »

कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात विद्यार्थीनींच्या आरोग्यविषयक कार्यशाळा संपन्न महिला विकास कक्षाचा अभिनव उपक्रम

राजतंत्र न्यूज नेटवर्क तलासरी, दि. 13 : दि. 1 : कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 11) विद्यार्थीनींच्या आरोग्यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मुलींच्या आरोग्यविषयक सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य ते उपचार करुन मुलींच्या सदृढ आरोग्याविषयी महिला विकास कक्ष व एल. अ‍ॅन्ड टी. कंपनीच्या चॅरीटेबल ट्रस्टमार्फत 6 महियाचा आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे यावेळी निश्चीत ... Read More »

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक, 2 गावठी पिस्तुल व 1 कट्टा हस्तगत, पालघर स्थानिक गुन्हे शाखेची वसईत कारवाइ

राजतंत्र न्युज नेटवर्क वसई, दि. 13 : खुनाच्या गुन्ह्यातील 2 फरार आरोपींसह त्यांच्या एका साथिदाराला अटक करण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असुन या आरोपींकडून 2 गावठी पिस्तुल व एक गावठी कट्टा अशी हत्यारे जप्त करण्यात आला आहे. आशुतोष जितेंद्र मिश्रा (वय 23), दिपक बलवान मलीक (वय 18) व शिवम ओमप्रकाश तिवारी (वय 19) अशी सदर आरोपींची नावे असुन ... Read More »

Scroll To Top