दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » 2019 » January » 08

Daily Archives: 08/01/2019

डहाणू: नगरसेवक भावेश देसाईंना लुटण्याचा धाडसी प्रयत्न; गोळीबारात सुदैवाने बचावले

RAJTANTRA BREAKING दि. ८: डहाणूचे नगरसेवक आणि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे संचालक भावेश देसाई यांना त्यांच्या निवासस्थानाजवळच लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आहे. ते रात्री ९ वाजताच्या सुमारास हॉटेल सरोवरच्या मागील बुद्धदेव नगर येथील निवासस्थानाकडे मोटारसायकलवरुन जात होते. तेथे दबा धरुन बसलेल्या दुक्कलीने डोळ्यात स्प्रे मारुन देसाई यांच्याकडील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. देसाई यांनी बॅग न सोडल्यामुळे त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार देखील ... Read More »

दादर-डहाणू लोकल फेरी पुर्ववत करा!

>> डहाणू वैतरणा संस्थेने राबवली स्वाक्षरी मोहिम वार्ताहर/बोईसर, दि. 8 : एक नोव्हेंबरपासुन बंद करण्यात आलेली दादर ते डहाणू लोकल फेरी पुन्हा सुरु करण्यासाठी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने स्वाक्षरी मोहीम राबवून 900 प्रवाशांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन पश्चिम रेल्वेचे अधिकारी सुनील कुमार यांना दिले आहे. मागील काही वर्षांपासुन दादरहून डहाणूसाठी सायंकाळी 4 वाजून 47 मिनिटांनी लोकल सोडण्यात येत होती. ही लोकल ... Read More »

करंदीकर महाविद्यालयात पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट व वारली चित्रकला अभ्यासक्रम उपलब्ध

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ८: येथील सौ. सीताबाई करंदीकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट ॲन्ड इंटरव्ह्यूव स्किल्स’ आणि मराठी विभागातर्फे ‘वारली चित्रकला’ हे दोन व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस सुरु करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीचे कौशल्य विकसित करुन त्यांना रोजगारभिमूख करणे हा ‘पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट ॲन्ड इंटरव्ह्यूव स्किल्स’ या अभ्यासक्रमाचा उद्देश असून ४० तासांच्या या अभ्यासक्रमासाठी २५० रुपये शुल्क आहे. तर चित्रकला गुण विकसित ... Read More »

वाडा नगरपंचायतीवर शिवसेनेचे वर्चस्व कायम

>> शिवसेनेकडे वाडा नगर पंचायतीच्या चार पैकी तीन समित्या वाडा, दि. 8 : वाडा नगरपंचायतीच्या चार विषय समित्यांसाठी आज, मंगळवारी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेचे तीन तर मित्र पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या एक सदस्याला बिनविरोध विजय मिळाला आहे. या निवडणूकीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक बिनविरोध झाली. वाडा नगरपंचायतीमध्ये मागील वर्षी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन ... Read More »

पॉलिश करण्याच्या बहाण्याने दहा तोळे सोने लंपास

>> आरोपी कॅमेर्‍यात कैद प्रतिनिधी/वाडा, दि. 8 : भांडी व सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन महिलांना गुंगारा देऊन त्यांच्याकडील दहा तोळे सोने घेऊन दोन चोरटे पसार झाल्याची घटना वाड्यात घडली असुन या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास वाड्यातील राम मंदिराजवळ राहणार्‍या वैभव गंधे यांच्या घरात पत्नी विना गंघे व त्यांच्या आई अशा दोघीच असताना दोन चोरटे ... Read More »

प्राध्यापक मिनल पाटील यांना पी.एच.डी.

राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ८: बोर्डी येथील एन. बी. मेहता विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका मिनल प्रफुल्ल पाटील यांना मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘ डेव्हलपमेंट ऑफ ट्रिस्टीम्युलस वायरलेस कॅलरीमीटर ॲंड इट्स मेडीकल ॲप्लिकेशन ‘ या विषयावर शोध निबंध सादर केला होता. प्रा. मिनल यांना भौतिकशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. टी. एन. घोरुडे यांचे मार्गदर्शन लाभले. आपण दैनिक राजतंत्रचे ... Read More »

डहाणू व तलासरीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बंद

आजच्या मागण्यांपैकी वाहनांची आरटीओ पासिंग डहाणू किंवा तलासरी येथे सुरु करावी ही स्थानिक मागणी होती. सध्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांना विरार येथे तर मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना कल्याण येथे पासिंगसाठी जावे लागते. उद्या (९ जानेवारी) डहाणू बंद नाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दिनांक ८ व ९ जानेवारी रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. तथापि हा बंद काही राज्यांत ८ जानेवारी रोजी ... Read More »

मनोरला इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिके, 57 मतदान केंद्रात 4 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान मतदारांना दाखवली जाणार प्रात्यक्षिके

प्रतिनिधी मनोर, दि. 7 : आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रात इव्हीएममशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमा अंतर्गत मनोर मंडळ क्षेत्रात सोमवारी (दि.07) मनोर टाकवाहाल, सवरखंड, कोसबाड, करळगाव आणि टेन या गावातील मतदारांना इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक ... Read More »

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

प्रतिनिधी मनोर, दि. 7 : किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत वसई तालुक्यातील सायवण जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दोनशे सायकल वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 9) सायवणला आयोजित करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत पोहोचण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरून प्रवास करावा लागतो त्यांना सायकलींचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. तसेच सायवन जिल्हा परिषद शाळेत इ-लर्निंग लॅबचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. कार्यक्रमास ... Read More »

मच्छिमार युवकांसाठी सातपाटी येथे प्रशिक्षण

राजतंत्र न्यूज नेटवर्क पालघर, दि. 7 : राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र असलेल्या सातपाटी येथे सागरी मत्स्यव्यवसाशी संबंधित नौकानयन, सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जात असुन सध्याचे प्रशिक्षण वर्ग 1 जानेवारी 2019 पासून सूरू झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गात 22 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असुन इच्छूक उमेदवारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत ... Read More »

Scroll To Top