दिनांक 21 October 2019 वेळ 2:38 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January (page 4)

Monthly Archives: January 2019

महाराष्ट्र शासन सदैव पत्रकारांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजतंत्र न्युज नेटवर्क मुंबई, दि. 23 : पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम रहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य देण्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या मार्फत आयोजित सह्याद्री अतिथीगृह येथे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ... Read More »

आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

  राजतंत्र न्युज नेटवर्क  जव्हार दि. 23 : जव्हार तालुक्यातील न्याहळे शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार देवराम मोरे (52) व लिपिक पुंडलिक कचरू दळवी (53) यांना एका शिक्षिकेकडून 1 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. तक्रारदार महिला न्याहळे शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षिका असून तिचा सहा महिन्याचा पगार काढण्यासाठी आरोपींनी लाच मागितली ... Read More »

आपण समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे-प्रसाद कुलकर्णी

राजतंत्र न्युज नेतवर्क  पालघर दि. 23 : आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपले जगणं विसरत चाललो आहोत. सकारात्मक विचार करुन आनंदी रहावे, अनेक चांगल्या गोष्टींचा स्वच्छंदपणे आस्वाद घ्यावा आणि निरोगी रहावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी पालघर येथे बोलताना केले. ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी वाड्.मय मंडळातर्फे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक संघ (तारापूर) यांच्यासाठी आयोजीत आनंद यात्रा ... Read More »

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. 23 : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना व पालघर प्रतिष्ठानतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 23 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. 24 जानेवारी रोजी शहरात कचर्‍याचे साम्राज्य वाढू नये यासाठी आणि स्वच्छ व सुंदर पालघरचा संकल्प घेऊन कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. ... Read More »

वाकसई येथे महिला लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शन व मेळावा

राजतंत्र न्युज नेटवर्क  पालघर दि. 23: जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्यातर्फे वाकसई ग्रामपंचायतीमध्ये पंचायत राज समितीमधील महिला लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शन व मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य योगेश पाटील, गावचे सरपंच उपेश घरत, ग्रामपंचायत सदस्य, महिला लोकप्रतिनिधी, जि प शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि महिला बचत गट उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्पाधिकारी ... Read More »

सैन्य पोलीस भरती पुर्व प्रशिक्षणार्थींचा आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा 

जव्हार, दि. २३:  येथील पळसूंडे गावच्या हद्दीतील सैन्य पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्रात भेडसावणाऱ्या विविध समस्या व अपुऱ्या  सोयी सुविधांबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रकल्प कार्यालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याचा आरोप करीत महादेव कोळी समाज उन्नती मंडळाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींनी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी उपस्थित नसल्याने सहाय्यक प्रकल्प अधिकारी  यांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व लवकरात लवकर शासन ... Read More »

इंटर डिस्ट्रिक्ट सब ज्युनियर वुमन्स फुटबॉल चँपियन स्पर्धेत मुंबईच्या संघाने बाजी मारली; नागपुरच्या मुलीं उपविजेत्या

पालघर जिल्हा फुटबॉल असोसिएशन व वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने बोईसर येथे पार पडलेल्या स्पर्धेत मुलींच्या मुंबई जिल्हा ज्युनियर संघाने बाजी मारली. तर नागपुर जिल्हा ज्युनियर मुलींचा संघ उपविजेता ठरला आहे. स्पर्धेमध्ये 24 जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिंदाल कंपनीचे महाव्यस्थापक जे. बी. लाड, आरती ड्रग्जचे ऊदय पाटील, पालघर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे ... Read More »

हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणार्‍या ट्रकला अपघात ट्रक जळून खाक, चालक जागीच ठार

डहाणू दि. 22: गुजरात मुंबई महामार्गावर चारोटी येथील पुलावर हायड्रोजन गॅसचे सिलेंडर वाहतुक करणार्‍या ट्रकला अपघात झाला असून अपघातात लागलेल्या आगीमुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जागीच जळून मृत्यूमुखी पडला आहे. भरोडा ते तळोजा येथील श्री जी कार्बोनिक कंपनीचा हा हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास कासा पोलीस ... Read More »

घोणसई ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार

वाडा, दि. 22: तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी, नियमबाह्य व भ्रष्ट कारभार सुरु असल्याचा आरोप करीत या कारभाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य विकास घरत यांनी पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे एका तक्रारी द्वारे केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, घोणसई ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरु असून या कारभारामुळे ग्रामपंचायतीने शासकीय नियम धाब्यावर बसवले आहेत. या ग्रामपंचायतीत ग्रामनिधीतून विकास कामे ... Read More »

प्राणिशास्त्राकडे सकारात्मकतेने पहावे- डॉ. संजय भागवत

पालघर,दि. 22 : विद्यार्थ्यांनी प्राणिशास्त्र विषयाकडे सकारात्मकतेने पहाण्याची गरज असून मधुमक्षीका पालन, दुग्धप्रकल्प, शेळीपालन, कोळंबी प्रकल्प, शोभिवंत माशांचे प्रजनन व विक्री, जैवमाहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन, पर्यावरणीय अहवाल बनविणे अशा विविधी क्षेत्रात रोजगार व उद्योगाच्या संधी आहेत, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन प्राणिशास्त्रज्ञ डॉ. संजय भागवत यांनी पालघर येथे बोलताना केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्राणिशास्त्रातील संशोधन आणि रोजगाराच्या संधी या ... Read More »

Scroll To Top