दिनांक 18 June 2019 वेळ 6:11 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January (page 2)

Monthly Archives: January 2019

पालघर येथे विद्यार्थी-प्रशासन परिसंवाद संपन्न 

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. 26:  आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख यांच्यात परिसंवाद घडवून आणण्यात आला. या परिसंवादात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात त्यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच सर्व विभागांचे ... Read More »

जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सॅनिटरी नॅपकिन व्हेन्डीग मशीन  

  राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर दि. २७ :  जिल्हा परिषद पालघर कार्यालयाच्या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अतंर्गत प्रजासत्ताक दिनी सॅनिटरी व्हेन्डीग मशीन व इन्सिनेटरचे उद्घाटन महिला व बाल कल्याण समिती सभापती धनश्री चौधरी व समाजकल्याण सभापती दर्शना दुमाडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालघर जिल्हा परिषदचे अध्यक्ष विजय खरपडे, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलिस अधिक्षक गौरव ... Read More »

स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त    बोइसर परिसरातील मोफत आरोग्य शिबीर

राजतंत्र न्युज नेटवर्क  बोईसर दि. २७: स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंती दिनानिमित्त बोईसर येथील धनानी नगरमध्ये शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, श्रीनिवास वनगा,  प्रभाकर राऊळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, निलम संखे, पंचायत समिती सदस्य  मुकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य परशुराम दुमाडा, अजय ठाकूर, कामिनी सुतार, ... Read More »

पालकांनी मुलांशी भाषा व साहित्याविषयी संवाद साधायला हवा! – डॉ. अरूणा ढेरे

राजतंत्र न्युज नेटवर्क  पुणे दि. 27: शिक्षक व पालकांसाठी साहित्य व मराठी भाषा हे विषय जिव्हाळ्याचे असले पाहिजेत. पालकच मुलांसमोर हातात मोबाईल घेऊन बसत असतील तर मुलंही त्यातच रमतील. मुलांना भाषेची गोडी लावायची असल्यास आधी पालकांनी हातात पुस्तक घ्यायला हवे. भाषा व साहित्याविषयी मुलांशी संवाद साधायला हवा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे यांनी पुणे ... Read More »

आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त  ग्रामीण रुग्णालयात फळांचे वाटप

राजतंत्र न्युज नेटवर्क  वाडा, दि.२७ : शिवसेना नेते स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना नारळ पाणी (शहाळे) वाटप करण्यात आले. शिवसेनेचे वाडा शहर प्रमुख नरेश चौधरी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वाडा नगर पंचायतीच्या नरगराध्यक्षा गीतांजली कोलेकर, नगर सेविका वर्षा गोळे, नयना चौधरी, जागृती काळन, प्रकाश केने, उमेश पठारे, प्रकाश पाटील रेश्मा ... Read More »

अर्नाळा येथील गोकुळ टाऊनशिप मध्ये पोलीस चौकी सुरु 

राजतंत्र न्युज नेटवर्क अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विरार पश्चिमेच्या लोकांच्या सोईसाठी गोकुळ टाऊनशिप मध्ये पोलीस चौकी सुरु करण्यात आली असून या नूतन चौकीचे वसई विभागाचे अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांच्या  हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे, स्थानिक नगरसेवक व महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का? दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय ... Read More »

दुचाकी अपघातात बालकाचा मृत्यू

राजतंत्र न्युज नेटवर्क  पालघर, दि. 27 : धुकटन-बहाडोली फाट्यावर दुचाकी अपघातात दोन महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला व 2 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सेल्वास येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  विक्रमगड येथील रहिवाशी असलेले रणजीत पागी हे शनिवार दि, 26 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून पालघरच्या दिशेने येत होते. पालघर-मनोर रस्त्यावर धुकटन -बहाडोली फाट्याजवळ ... Read More »

वसईत कारशेडला आगे, 100 गाड्या जळून खाक

राजतंत्र न्युज नेटवर्क वसई, दि. 27: येथील टॅब कॅब कंपनीच्या कारशेडला लागलेल्या आगीत तब्बल 100 गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हे कारशेड वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत एका खुल्या जागेवर आहे.  वसई पूर्वेला ससूननगरमधील मालाजी पाडा भागात हे कारशेड आहे. या कारशेडला शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. याची ... Read More »

डहाणू : खूनाच्या गुन्ह्यात २ आरोपींना शिताफीने अटक

RAJTANTRA MEDIA डहाणू दिनांक २६: रस्त्याच्या कडेला मुक्काम ठोकणाऱ्या आरोपीची पत्नी व मुलगी झोपलेल्या ठिकाणी बाजूला चटई टाकून झोपलेल्या मजूराला रागाच्या भरात मारहाण करुन ठार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात डहाणू पोलीसांना यश आले आहे. हकीम पवार (३५) व रोहित चव्हाण (१९) अशी आरोपींची नावे आहेत. डहाणू येथील एसटी डेपोच्या बाहेरील बाजूस मणी, शंख विक्री करणारे आरोपी व त्यांच्या कुटूंबीयांचा पडाव होता. ... Read More »

बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून पेयजल योजनेचे भूमिपुजन

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर, दि. २५: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पालघर जिल्हा परिषदेतर्फे पालघर तालुक्यातील दांडी, उच्छेळी व उनभाट या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पेयजल योजनेचे भूमिपुजन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार राजेश गावीत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, उपाध्यक्ष निलेश गंधे, प्रभाकर राऊळ, जिल्हा परिषद सदस्य तुलसीदास तामोरे ... Read More »

Scroll To Top