दिनांक 21 October 2019 वेळ 3:46 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January (page 11)

Monthly Archives: January 2019

पालघर : शॉर्ट सर्किटमुळे दोन घरं जळून खाक

वार्ताहर/बोईसर, दि. 3 : पालघर जवळील पंचाळी-आगवण गावात मच्छिद्र जगु माच्छी व शिवाजी जगु माच्छी या दोन्ही भावांचे घर इलेक्ट्रिक शॉट सर्किटमुळे आग लागून खाक झाले आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास विजेच्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. शार्ट सर्किट झाले त्यावेळी घरातील माणसे कामानिमित्त बाहेर तर मुलं शाळेत गेल्याने ही आग पसरत गेली व दोन्ही घरे ... Read More »

वाडा : भिंत अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

>> वाड्यातील नारे येथील घटना >> संतप्त नातेवाईकांनी महामार्ग रोखला >> कंपनीचीही केली तोडफोड प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : तालुक्यातील नारे येथील जिप्सम (सेंट गोबेन) या कंपनीत आज सकाळच्या सुमारास अंगावर भिंत कोसळल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष उर्फ राजेश सदाशिव पाटील (वय 38) असे सदर कामगाराचे नाव असुन कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करून मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई ... Read More »

वाड्यातील विजय जोगमार्गे यांना आदर्श राज्य कलाध्यापक पुरस्कार

प्रतिनिधी/कुडूस, दि. 2 : चंद्रपूर येथे झालेल्या 40 व्या राज्य कलाशिक्षण परिषदेत उचाट शिक्षण संस्थेच्या अस्पी विद्यालयातील (उचाट) कला शिक्षक विजय जोगमार्गे यांना राज्य आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने शिक्षण उपसंचालक निलेश पाटील व महामंडळाच्या पदाधिकार्‍यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विजय जोगमार्गे हे उत्कृष्ट चित्रकार असून ते एक लेखक व कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या व्यासंगाची दखल घेऊन राज्य कलाध्यापक संघाने ... Read More »

जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र

Rajtantra Media/पालघर, दि. 2 : जव्हार तालुक्यातील जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला केंद्र सरकारच्या स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. पालघर सारख्या आदिवासी बहुल आणि नवीन जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असून जिल्ह्यातील आरोग्य सोईसुविधा सुधारण्यासाठी सुरु असलेल्या अविरत प्रयत्नाचे हे फलित म्हणावे लागेल, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याप्रसंगी ... Read More »

भिवंडी-वाडा महामार्गावर दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

प्रतिनिधी/वाडा, दि. 1 : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भिवंडी-वाडा महामार्गवर झालेल्या अपघातात 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जतीन गजानन भोईर असे सदर तरुणाचे नाव असुन अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील गायगोठा (निंबवली) येथील मूळचा रहिवाशी असलेला जतीन रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास एम.एच. 04 एच. क्यू.6115 क्रमांकाच्या दुचाकीवरून वाड्याहून चिंचघर येथे जात असताना शिरीष पाडा व ... Read More »

कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने अंघोळ

>> पालघरमधील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल वार्ताहर/बोईसर, दि. 1 : पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना ऐन थंडीच्या दिवसात थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. तर मुलींच्या वसतिगृहाच्या खिडक्यांच्या काचा तुटल्याने संपुर्ण रात्र डासांचा सामना करून मुलींना रात्र घालवावी लागत आहे. आदिवासी विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील विद्यार्थ्यांना मोठे हाल सहन करुन शिक्षण घ्यावे लागत असल्याने विभागाने येथे गरम पाण्याची ... Read More »

मध्यवैतरणा-कसारा रस्त्याचे भवितव्य अधांतरी

>> दोन विभागात रस्ता धोक्यात  >> उत्तरदायित्व घेणार कोण?  >>प्रवाशांचा खडा सवाल! दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 1 : तालुक्यातील खुद्द मोखाड्यापासून विहीगाव पर्यंतच्या रस्त्यावर बहूतांश ठिकाणी अद्ययावतीकरणाची नितांत आवश्यकता असताना या राज्यमार्गावरील मस्त नात पुलापासून पुढे कसार्‍याकडील रस्ता कोणाच्या अखत्यारीत येत असल्याचे स्पष्ट नसल्याने रस्त्याचे अद्ययावतीकरण खोळंबले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मोखाडा – खोडाळा – विहींगांव ... Read More »

Scroll To Top