दिनांक 21 October 2019 वेळ 2:39 AM
Breaking News
You are here: Home » 2019 » January (page 10)

Monthly Archives: January 2019

वाडा नगरपंचायत विषय समितीची उद्या निवडणूक

>> काँग्रेसला उप नगराध्यक्ष पद मिळण्याची शक्यता प्रतिंनिधी/वाडा : वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासह पाच विषय समितीच्या सभापती पदांसाठी उद्या, मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन या नगरपंचायतीमध्ये मागील वर्षी शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व आरपीआयला सोबत घेऊन सत्ता स्थापन केलेली असल्याने सत्तास्थापनेवेळी झालेल्या करारानुसार समित्यांचे वाटप होईल असे चित्र आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पद थेट जनतेतून निवडून ... Read More »

पालघर येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

Rajtantra Media/पालघर दि. 07 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व पालघर नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी (दि. 11) रोजगार मेळावा व कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन सकाळी 10 वाजता येथील लायन्स क्लब ऑफ पालघरच्या कार्यालयात हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यास परिसरातील 15 नामांकित कंपन्या आपल्या रिक्त पदांच्या माहितीसह उपस्थित राहून ... Read More »

आगीत घर गमावलेल्या कुटुंबाना शिवसेनेची आर्थिक मदत

 वार्ताहर बोईसर,दि.६ : पालघर तालुक्यातील मितना समाजाची वस्ती असलेल्या पंचाळे गावातील आगवण पाडा येथे नुकतेच शिवाजी शिवाजी माच्छी व मच्छिद्र माच्छी दोन कुटुंबाच्या घरांना आग लागल्यामुळे शिवाजी माच्छी व मच्छिद्र माच्छी या दोन कुटूंबाचे दोन्ही घरे शॉर्ट सर्किट मुळे आग लागून जाळून खाक झाली .त्यामुळे या दोन्ही कुटुंबाचा संसार उघड्यार आल्याने शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे यांनी दोन्ही कुटुंबांना ... Read More »

पालघर जिल्ह्यात महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी करणार -ज्योती ठाकरे

वार्ताहर/बोईसर, दि. 6 : बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याशिवाय त्यांना समाजात अपेक्षित असा मान-सन्मान मिळणे शक्य नाही. त्यासाठी पालघर जिल्ह्यात लवकरात लवकर महिला व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचे प्रयत्न असून महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक-सामाजिक दृष्ट्या कमकुवत महिलांसाठी सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले. आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघर व युवराज्ञी ... Read More »

पत्रकार हा समाजाचा आरसा -मेघना पाटील

प्रतिनिधी/वाडा, दि. 6 : समाजातील दुर्बळ घटकांना खर्‍या अर्थाने प्रवाहात आणण्याचे काम चोखपणे पत्रकार बजावत असतात. आपले कर्तव्य बजावत असताना वेळ प्रसंगी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला तरी ते आपले कर्तव्य प्रामाणिक व पारदर्शकपणे बजावत असल्याने पत्रकार हा खर्‍या अर्थाने समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन वाडा पंचायत समितीच्या उपसभापती मेघना पाटील यांनी केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आंबिस्ते येथील ... Read More »

मोखाडा : दुचाकी अपघातात दोन ठार, दोन गंभीर जखमी

प्रतिंनिधी/मोखाडा, दि. 6 : मोखाड्यावळील काजू पाडा येथे समोरून येणार्‍या प्रवासी वाहतूक गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील चौघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.5) घडली. गणेश चंदर दुमाड (21) व देविदास गंगाराम दुमाड (20) अशी मृत्यु झालेल्या विद्यार्थ्यांची नावे असुन संदीप दुमाड आणि पांडुरंग टोपले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिकच्या ... Read More »

वाडा : रेझिंग डे निमित्त पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी वाडा,दि.४ पोलीस दलाकडून २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पोलीस दला विषयी माहिती देऊन रेझिंग डे उत्साहात साजरा केला. वाडा पोलिसस्टेशनमध्ये आयोजित या मार्गदर्शनपर कार्यक्रमात पी.जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून होणारे दुष्परिणाम, पोस्को ... Read More »

ठवळपाड्यातील धोकादायक समाजमंदिर जमीनदोस्त कधी करणार ? ग्रामस्थांचा सवाल

प्रतिनिधी मोखाडा, दि.४ : तालुक्यातील नाशेरा ग्रामपंचायत हद्दीतील ठवळपाडा येथील समाजमंदिराच्या इमारतीची अक्षरशः पडझड झालेली असुन.मागील दोन वर्षांपासून समाजमंदिराची परिस्थिती जैसे थे च आहे.बाजूलाच जिल्हापरिषदेची शाळा असून बहूसंख्य विद्यार्थ्यांचा येथे मुक्त वावर असतो. मात्र तरीही संबंधीत विभागाकडून समाजमंदिराच्या दुरूस्ती बाबत कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून एखादी अप्रिय घटना घडल्यावरच समाजमंदिर पाडण्याची कार्यवाही करणार का ? असा ... Read More »

दांडेकर महाविद्यालयात युवकांच्या मानसिक आरोग्याविषयी कार्यशाळा संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क पालघर,दि.४ : आपल्या सभोवतालच्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे ही एक समाजसेवाच आहे. आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे’ असे प्रतिपादन ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या मानसशास्त्र विभागामधील प्रोफेसर व कन्सलटंट डॉ. सुनिता निकुंभ यांनी केले. विद्यार्थ्यांचे मानसिक प्रश्न शिक्षकांनी समजून घ्यावे त्यांना मानसिक समस्येतून बाहेर काढता यावे याकरिता सोनोपंत दांडेकर वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय आणि ढवळे मेमोरियल ट्रस्ट यांच्या ... Read More »

पालघरमध्ये ज्येष्ठ पत्रकारावर खाकीची मस्ती ट्रॅफीक पोलीसाची बदली व विभागीय चौकशी

पालघर, दि. ४:  पोलिसांकडून पत्रकारांवर होणार्‍या खोट्या कारवायांमुळे असंतोष असताना त्यात आणखी एका घटनेची भर पडली. येथील दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार पी. एम. पाटील यांच्याशी काल वसावे नामक ट्रॅफिक पोलिसाने गैरवर्तन करीत त्यांची कॉलर पकडली आणि पोलीस चौकीत नेले. या घटनेचा पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषद व पालघर जिल्हा पत्रकार संघाने तिव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. रस्त्यात प्रचंड वाहतूक कोंडी ... Read More »

Scroll To Top