दिनांक 06 April 2020 वेळ 3:19 AM
Breaking News
You are here: Home » 2019

Yearly Archives: 2019

जिल्ह्यातील विविध अवैध धंद्यांवर कारवाया; वर्षभरात 50 कोटींचा मुद्देमाल जप्त

शेकडो आरोपींविरोधात गुन्हे राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 31 : गेल्या वर्षभरात पालघर जिल्हा पोलीस दलाकडुन जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करुन सुमारे 51 कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच शेकडो आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. यात रेतीचोरी, गुटखा, दारुबंदी, जुगार व मटका, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, बांगलादेशी नागरीकांवर कारवाई तसेच अवैधरित्या हत्यारे बाळगल्यांसारख्या गुन्ह्यांचा ... Read More »

विक्रमगड : गावठी बॉम्ब हल्ले करणार्‍या माथेफिरुला अटक

पालघर एटीएस व बॉम्ब शोधक पथकाची कारवाई विक्रमगड, दि. 31 : जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसह शेजार्‍यांवर बॉम्ब हल्ले करुन दहशत माजवणार्‍या एका माथेफिरुला पालघर दहशतवाद विरोधी कक्ष (एटीएस) व बॉम्ब शोधक पथकाने सापळा रचून अटक केली आहे. संतोष यशवंत शेंडे (वय 37) असे सदर आरोपीचे नाव असुन याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. विक्रमगड तालुक्यातील खोस्ते शेंडेपाडा येथे राहणार्‍या ... Read More »

वाड्यातील चिमुकल्यांचा अनोखा थर्टी फर्स्ट

कचर्‍यापासून साकारले शोभिवंत वन्यप्राणी पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश प्रतिनिधी/वाडा, दि. 31 : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आजची तरूण पिढी मद्यधुंद पार्ट्यांकडे वळत असतानाच वाडा तालुक्यातील गोराड गावातील चिमुकल्यांनी मात्र गल्लीबोळातील कचरा गोळा करून त्या कचर्‍यापासून वन्यप्राण्यांची प्रतिकृती साकारुन पर्यावरण पूरक 31 डिसेंबरचा संदेश दिला आहे. या उपक्रमाची प्रेरणा येथील कला शिक्षक महेश काचरे हे ठरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून गोराड ... Read More »

सायवन, मोडगाव, हळदपाड्यात लाल बावट्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा

बंडखोरांची केली हकालपट्टी राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 30 : तालुक्यातील सायवन व मोडगाव जिल्हा परिषद गट तसेच सायवन व हळदपाडा पंचायत समिती गण न लढवता या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे व पालघर जिल्हा कमिटीने एकमताने घेतला होता. त्यानुसार सायवन आणि हळदपाडा या पंचायत समिती गणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ... Read More »

बस प्रवासा दरम्यान महिलेची पर्स लंपास

सव्वा लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरीला वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : अनगाव ते कुडूस दरम्यान प्रवास करत असलेल्या एका महिलेची अज्ञात चोरट्याने पर्स लांबवली असुन त्यात सोन्याचे एक गंठण, एक मोबाईल व रोख रक्कम असा सव्वा लाखाहून अधिकचा ऐवज असल्याची तक्रार वाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. वाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सुलभा शिंदे या ... Read More »

सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ पालघरमध्ये भव्य रॅली

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर, दि. 30 : राष्ट्रीय नागरीकता नोंदणी (एनआरसी) व सुधारित नागरीकत्व कायद्या (सीएए) च्या समर्थनार्थ आज, सोमवारी पालघरमध्ये संविधान सन्मान मंचच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी सहभाग नोंदवला. सुमारे 30 हजार लोक तिरंगा घेऊन या रॅलीत सामिल झाले होते. एनआरसी व सीएए कायदा संविधानविरोधी असल्याचे सांगत मागील काही दिवसांपासुन देशातील अनेक ... Read More »

वाडा : अक्षय लॉजवर पोलिसांचा छापा; 7 युगुलांवर कारवाई

प्रतिनिधी/वाडा, दि. 27 : तालुक्यातील शिरीषपाडा येथील अक्षय लॉजवर अनैतिक व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्याने वाडा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 7 युगुलांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अक्षय लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय चालत असल्याचा संशय पोलिसांना होता. सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर वाडा पोलिसांनी शुक्रवारी (दि. 27) या लॉजवर धाड टाकली असता लॉजच्या परिसरात 7 युगुल अश्लील कृत्य करत ... Read More »

पांचाळ समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!

शिरीष कोकीळ/डहाणू, दि. 27 : श्री पांचाळ समाज मध्यवर्ती मंगळ, डहाणू शाखेचे 26 वे स्नेहसंमेलन 25 डिसेंबर रोजी श्री पांचाळ समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या भव्य सभामंडपात आयोजित करण्यात आले होते. यावेळी नियोजित अध्यक्ष म्हणून मनोहर मेस्त्री व त्यांच्या पत्नी सौ. ममता मेस्त्री, प्रमुख पाहुणे म्हणून नितीन लोहार व त्यांच्या पत्नी सौ. मनिषा लोहार, विशेष अतिथी म्हणून दै. राजतंत्रचे संपादक संजीव जोशी ... Read More »

डहाणूतील तरुणांचा मडगाव ते कन्याकुमारीपर्यंत सायकल प्रवास

आठ दिवसात गाठले सुमारे 1350 किलोमीटर अंतर राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 26 : तालुक्यातील धाकटी डहाणू येथील दोन तरुणांनी गोव्यातील मडगाव ते कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास सायकलवरुन पुर्ण करण्याची किमया केली आहे. आठ दिवसात या तरुणांनी तब्बल 1250 ते 1350 किमीपर्यंतचा हा पल्ला गाठला. गौरव किशोर तांडेल (वय 28) व प्रज्योत नरेश तामोरे (वय 26) अशी सदर तरुणांची नावे आहेत. तर गणेश ... Read More »

मुख्य निवडणूक निरीक्षकांचा पालघर जिल्हा दौरा

राजतंत्र न्युज नेटवर्क/पालघर 27 : पालघर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांनी मुख्य निवडणुक निरीक्षक म्हणुन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप भा. हळदे व निवडणुक निरीक्षक म्हणुन पालघरचे अपर जिल्हाधिकारी दिलीप गुट्टे यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार निवडणुकीशी संबंधित कामांच्या पार्श्‍वभुमीवर मुख्य निवडणुक निरीक्षक हळदे व निवडणुक निरीक्षक गुट्टे 29 ... Read More »

Scroll To Top