दिनांक 18 June 2019 वेळ 6:57 AM
Breaking News
You are here: Home » 2018 » December » 09

Daily Archives: 09/12/2018

वर्सोवा पुलाच्या कामामुळे मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावर वाहतूककोंडी

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी या पूलावरील वाहतूक बंद करून ती मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे आधीच अपूर्ण कामांनी ग्रासलेल्या या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच अपघातांचा धोका देखील वाढला आहे. वर्दळीचा मार्ग समजल्या जाणार्‍या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी जवळपास दीड महिना हा पुल अवजड वाहतूकीसाठी बंद ... Read More »

पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

प्रतिनिधी/वाडा, दि. 9 : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहुन शिंदेवाडी येथे आलेल्या दोन तरुणांचा तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन या घटनेने शिंदेवाडी येथे दुःखद शांतता पसरली आहे. रविवारच्या सुट्टीची मजा घेण्यासाठी मुंबई येथील मालाडहुन जवळपास 35 जण सकाळी तालुक्यातील शिंदेवाडी (उचाट) येथील शिंदे परिवाराकडे आले होते. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा माघारी परतण्याचा त्यांचा ... Read More »

खोडाळ्यात मोकाट गुरं, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट

>> ग्रामपंचायतीने प्रतिबंध करावा, ग्रामस्थ व बाजारकरूंची मागणी प्रतिनिधी/मोखाडा, दि. 9 : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथे भटक्या कुत्र्यांबरोबरच मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झालेला आहे. मोकाट जनावरं व भटक्या कुत्र्यांचा येथे मुक्त संचार असल्याने ग्रामस्थ, बाजारकरु व व्यापार्‍यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील खोडाळा ही महत्वाची बाजारपेठ आहे. बाजारहाट करण्यासाठी लगतच्या 28 खेड्यातील बहूसंख्य लोकांचा राबता ... Read More »

बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला स्थगिती

वार्ताहर/बोईसर, दि. 09 : जागेवरुन वाद सुरु असतानाच पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाला पालघर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिल्याने अनेक वर्षांपासुन सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाच्या प्रतिक्षेत असलेल्या बोईसरमधील गरीब व गरजू नागरीकांना आणखी काही काळ चांगल्या आरोग्यसेवेपासुन वंचित राहावे लागणार आहे. मागील काही वर्षात बोईसरमध्ये वाढलेली लोकसंख्या पाहता व सध्याच्या नवापूर येथे कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतील अपुर्‍या ... Read More »

Scroll To Top