दिनांक 21 January 2019 वेळ 4:47 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » December

Monthly Archives: December 2018

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिकांचा शुभारंभ!

EVM VVPAT

>> मतदारांनी माहिती जाणून घ्यावी -जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे Rajtantra Media/पालघर दि. 28 : ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) आणि व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मशिनबाबत असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असुन त्यानुसार पालघर तालुक्यातील सातपाटी गावात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणार्‍या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत काही जणांकडून ... Read More »

मार्क्सवादी कम्युनिस्टांचा उत्पादन शुल्कवर मोर्चा

डहाणू दि. 28 : ज्या स्थानिक आदिवासींच्या जमिनीवर ताडीची झाडे आहेत त्यांना त्यापासून रोजगार मिळाला पाहिजे, गोरगरिबांवर खोट्या केसेस करणे थांबवावे आणि दमणच्या दारु विक्रीवर कारवाई करा, अशा मागण्या घेऊन आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे उत्पादन शुल्क विभागावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी रडका कलागडा, विनोद निकोले, लहानी दौडा, चंद्रकात घोरखना उपस्थित होते.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का? दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या! स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा! ➡ DOWNLOAD APP ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!   Share on: WhatsApp Read More »

माविमच्या पालघरमधील कार्यालयाचे उद्घाटन

MAVIM KARYALAY1

>> बचतगटांच्या दर्जेदार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार -ज्योती ठाकरे Rajtantra Media/पालघर, दि. 24 : राज्यातील महिला बचत गट आता लोणचे-पापडच्या चाकोरीतून बाहेर पडून अनेक उत्तमोत्तम उत्पादनांची निर्मिती करू लागले आहेत. महिला बचतगटांनी दर्जेदार उत्पादने दिली तर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) घेईल, असे प्रतिपादन माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले. माविमच्या पालघर जिल्हा ... Read More »

वणवा विझवण्याच्या प्रयत्नात 16 वर्षीय मुलगी भाजली

WADA AAG

प्रतिनिधी/वाडा, दि. 27 : शेताशेजारी पेटलेला वणवा आपल्या शेतात (पलाट) पसरु नये म्हणून आग विझवण्याचा प्रयत्न करणारी 16 वर्षीय मुलगी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने गंभीररित्या भाजल्याची घटना विलकोस (सरसओळ) येथे घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील विलकोस गावातील रहिवासी असलेली मनिषा उमेश कोलेकर ही पलाटावर गेली असता तिथे जवळच वणवा पेटला असल्याचे तिच्या नजरेस पडले. हा वणवा शेतावर ... Read More »

मोखाड्याच्या लघुपटाची साता समुद्रापार भरारी

MADHLI SUTTI

> नायजेरीयात वाजणार मधली सुट्टीची घंटा दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 27 :  मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या अनुभवातून साकारलेल्या व आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणार्‍या मधली सुट्टी या लघुपटाने सातासमुद्रापार भरारी घेतली असुन नायजेरीयातील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये मधली सुट्टीला अधिकृत नामांकन मिळाले आहे. आदिवासी समाजातील दारिद्य्र, व्यसनाधिनता, पोटातील भुक, कुटूंबाप्रती असलेला जिव्हाळा, बाल वयातच पडणारे कुटुंबाचे ओझे आणि त्यामुळे अध्ययनावर होणारे ... Read More »

डहाणूच्या सौ. शैलजा पाटील राज्य पुरस्काराने सन्मानित

SHAILAJA PATIL RAJYA PURSKAR

प्रतिनिधी/डहाणू, दि. 27 : नरपड येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, समाज सेविका सौ. शैलजा अशोक पाटील यांना महाराष्ट्र पेंशनर्स असोसिएशन (पुणे) तर्फे 23 डिसेंबर रोजी पुण्यातील उद्यान मंगल कार्यालय येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात वर्ष 2018 च्या निवृत्त सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, महावस्त्र व पुष्पगुच्छ देऊन सौ. ... Read More »

वाड्यातील सुप्रसिद्ध डॉ. विकास पाटील यांचे निधन

VIKAS PATIL

प्रतिनिधी/वाडा, दि. 26 : पालघर जिल्ह्यात सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख असणार्‍या तालुक्यातील पिक येथील रहिवासी डॉ. विकास मधुकर पाटील (वय 47) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले असुन त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ. विकास मधुकर पाटील यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वाडा येथे आपले स्वत:चे सुमधुर रुग्णालय सुरु केले. सामाजिक कार्याची आवड असल्याने ... Read More »

3 ते 7 जानेवारी दरम्यान विरार येथे जिल्हा कृषी महोत्सव

BANNER

>> सर्वांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे आवाहन Rajtantra Media/पालघर, दि. 26 : शेतकर्‍यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देता यावे तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी आणि इतर शेतकर्‍यांना आपापसातील विचारांची देवाण-घेवाण करता यावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध देण्याच्या उद्देशाने विरारमधील विवा कॉलेज येथे 3 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या महोत्सवास सर्वांनी उत्स्फूर्त ... Read More »

मुख्य सेविका पी. डी. पष्टे यांचा जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मान

P. D. PASHTE SANMAN

प्रतिनिधी/कुडूस, दि. 25 : कुडूस एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प वाडा (2) येथे कार्यरत असलेल्या मुख्य सेविका श्रीमती पी. डी. पष्टे यांना पालघर जिल्हा परिषदतर्फे आदर्श मुख्य सेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पालघर येथे आयोजित करण्यात आलेल्या पालघर सरस या कार्यक्रमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर, शिवसेना गटनेते प्रकाश निकम, पालघर नगराध्यक्ष उत्तम पिंगळे, महिला व ... Read More »

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा तरूणांनी लाभ घ्यावा!

AANASAHEB PATIL YOJNA1

>> अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आवाहन Rajtantra Media/पालघर, दि. 24 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणार्‍या व तशी क्षमता असलेल्या तरूण वर्गाला आर्थिक सहाय्य पुरविण्याच्या दृष्टीने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकासअभियानाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त तरूणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ... Read More »

Scroll To Top