दिनांक 20 January 2019 वेळ 8:12 PM
Breaking News
You are here: Home » 2018 » November

Monthly Archives: November 2018

वाडा : सदनिकाधारकांची फसवणूक; विकासकाविरुद्ध मोफा अंतर्गत कारवाई

BANNER

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : शहरातील अशोकवन या प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या भागातील अशोकलीला या इमारतीतील सदनिकाधारकांची मानसिक छळवणूक व फसवणूक केल्याप्रकरणी सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन विकासक विकास जाधव यांच्यावर महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायदा अर्थात मोफा अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. वाडा शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या मागे अशोकवन हा नावाजलेला भाग आहे. या भागात अशोकलीला ही इमारत 2012 पासून उभी ... Read More »

कासा पोलीस स्टेशनचा लाचखोर पोलीस उप निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

KASA LACHKHOR POLICE

प्रतिनिधी/डहाणू, दि. 29 : पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेला गुन्हा कमकुवत करण्यासाठी 2 लाख रुपयांची मागणी करणार्‍या कासा पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) लाच स्विकारताना संगेहाथ अटक केली आहे. तुषार शालिग्राम भदाने (वय 32) असे सदर लाचखोर अधिकार्‍याचे नाव असुन पहिला हफ्ता म्हणून 75 हजार रुपयांची रक्कम स्विकारताना भदानेसह अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. कासा पोलीस ... Read More »

बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीत बीएआरसीची आडकाठी

भाडे तत्वावर असलेले सध्याचे ग्रामीण रुग्णालय

>>जागेच्या वादामुळे रखडले काम >>जुन्या इमारतीतील अपुर्‍या जागेमुळे रुग्णांचे हाल वैदेही वाढाण/बोईसर, दि. 29 : काही वर्षांपुर्वी शासनाने बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी मंजूर केलेल्या जागेवर भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) व तारापूर अणुऊर्जा केंद्राने (एनपीसीआयएल) आपला ताबा सांगत आडकाठी निर्माण केल्यामुळे बोईसरमधील गरीब व कामगार वर्गाला आणखी काही काळ नवीन ग्रामीण रुग्णालय इमारतीची प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बोईसर शहर आज ... Read More »

वाडा-मनोर मार्गावर अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

WADA ACCIDENT

दिनेश यादव/वाडा, दि. 28 : वाडा-मनोर महामार्गावरील वरले गावाजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या टेम्पाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर वाड्यातील शर्वरी रुग्णालयात उपचार सुरु असुन सुप्रीम कंपनीच्या अपूर्ण असलेल्या रस्त्याच्या कामामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप होत आहे. विक्रमगड तालुक्यातील आपटी येथील दिनेश हडळ (वय 22) आणि रोहित ... Read More »

बंद पडलेल्या डिजिटल शाळांना पेसाने दिले जीवनदान

MOKHADA DIGITAL SHALA

> आसे केंद्रातील 14 शाळांचे सौरउर्जेद्वारे विद्युतीकरण दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील 2035 डिजीटल शाळांपैकी बहूतांश शाळांमध्ये थकित विजबिलांमुळे अंधाराचे साम्राज्य आहे. मात्र आसे ग्रामपंचायतीने यावर नामी उपाय काढत पेसाच्या निधीतुन शाळांना सोलर पॅनल देऊन बंद पडलेल्या डिजिटल यंत्र सामुग्रीला सौरउर्जेद्वारे जिवनदान दिले आहे. त्यामुळे येथील 14 शाळा पुन्हा झगमगाटल्या असुन अशाच प्रकारे निधीचा योग्य वापर केल्यास जिल्ह्यातील ... Read More »

समुद्र क्षेत्रातील घुसखोरी रोखण्यासाठी समन्वय समितीची स्थापना

संग्रहित छायाचित्र

वार्ताहर/बोईसर, दि. 27 : मासेमारीच्या नियमांचे उल्लंघन करून दमण ते दातीवरे समुद्र क्षेत्रात बेकायदा मासेमारी करणार्‍या ठाणे, वसई, अर्नाळा व गुजरात राज्यातील जाफराबाद येथील मच्छीमारांना रोखण्यासाठी दमण ते दातीवरे दरम्यानच्या सर्व मच्छीमार संघटनांनी एकत्र येत समन्वय समितीची स्थापना केली आहे. गेल्या महिन्यात पालघरमधील वडराई समुद्र किनार्‍यापासून 12 नॉटिकल अंतरावर मुंबईमधील ट्रॉलर पकडण्यात आले होते. या ट्रॉलरमध्ये लाखो रुपयांचे मासे आढळले ... Read More »

जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन

GOVER RUBELA1

पहिल्या दिवशी 25 हजार मुलांचे लसीकरण Rajtantra Media/पालघर, दि. 27 : शासनातर्फे जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील तब्बल 8 लाख बालकांना गोवर व रुबेला लस देण्यात येणार असून या मोहिमेचा आज सर्व तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेच्या पहिल्या दिवशी जवळपास 25 हजार मुला-मुलींना ही लस देण्यात आली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांच्या हस्ते वाड्यातील पी. जे. ... Read More »

वाडा : क्षुल्लक कारणावरून मुलांनीच केली वडिलांची हत्या

BANNER

प्रतिनिधी/वाडा, दि. 26 : तालुक्यातील बागलांची खरीवली या गावात क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलांनीच वडिलांची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. काळूराम गणू जाधव असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असुन याप्रकरणी दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास काळूराम जाधव (वय 52) यांचे आपली मुले दीपक जाधव (वय 29) व निलेश जाधव (वय 24) यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वाद ... Read More »

रोहयोतील हफ्त्यांची माहिती देण्यास टाळाटाळ, श्रमजीवीने कृषी कार्यालयाला ठोकले टाळे

MOKHADA SHRAMJIVI

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 26 : शेतकर्‍यांकडून सातत्याने रोजगार हमी योजनेतील हफ्त्यांची माहिती मागूनही माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या तालुका कृषी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेने आज ठिय्या देऊनही माहिती न मिळाल्याने आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले आहे. तालुक्यातील फळबाग लागवड योजनेतील रोजगार हमीचे पहिलेच हफ्ते अदा करण्यात आलेले आहेत. त्यापुढील हफ्ते मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेने या संदर्भात माहिती मागविली होती. ... Read More »

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

Untitled-1

Rajtantra Media/पालघर, दि. 26 : 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान समितीने स्वीकारला होता. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या ... Read More »

Scroll To Top